एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खडसेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा : पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर : महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम यांच्यातील कॉलप्रकरण हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरुन द्यावं, तसंच दोषी व्यक्तीवर राष्ट्रीय सुरक्षा भंग केल्याप्रकारणी गुन्हा दाखल करुन, एकनाथ खडसेंना राज्याच्या मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, अशी मागणी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
एकनाथ खडसेंच्या मुद्द्यावरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.
राज्य सरकारचा गलथान कारभार सुरु आहे. खडसे-दाऊद कॉलप्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यांचा राजीनामा घेऊन, मंत्रिमंडळातून बरखास्त करा, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
- महाराष्ट्र सरकारचा गलथान कारभार
- गेल्या 2 वर्षात निर्यात घटली, त्यामुळे उद्योगावर मोठा परिणाम
- शेतकऱयांना पूर्ण कर्ज माफी करा
- महाराष्ट्र सरकार इव्हेंट मॅनेजमेंट करतय
- मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या- सरकारी आकडेवारीतून आलं समोर
- मोदी सरकारमुळे औद्योगिक क्षेत्रात मंदी; औद्योगिक क्षेत्रात वाढ झालीच नाही
- राज्य सरकारने 2594 परदेशी कंपन्यासोबत केलेल्या कराराची अद्याप माहिती विधीमंडळाला मागून देखील दिली नाही
- स्वच्छ भारत आणि स्मार्ट सिटी योजनेचा बोऱ्या वाजला
- मोदी सरकार कृषी आणि अर्थ व्यवस्थेत अपयशी
- गुंतवणूक होत नसल्याने महाराष्ट्र सरकार पूर्णतः अपयशी
संबंधित बातम्या
एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना
एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?
खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला
मुख्यमंत्री दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता
ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण
..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे
खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात
गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील
‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’
खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण
खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?
दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
‘आप’कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement