एक्स्प्लोर

पंतप्रधानांना उद्योजक, कलाकार, खेळाडूंना भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटत नाहीत : भारत दिघोळे

उद्योजक, कलाकार, खेळाडू, राजकारणी यांना भेटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे शेतकऱ्यांना (Farmers) भेटत नसल्याची टीका कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे (Bharat Dhigole) यांनी केलं.

Nashik News : देशातील उद्योजक, कलाकार, खेळाडू, राजकारणी यांना भेटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शेतकऱ्यांना (Farmers) भेटत नसल्याचे वक्तव्य महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नेते भारत दिघोळे (Bharat Dhigole) यांनी केलं. कृषीप्रधान अशी ओळख असलेल्या देशात शेतकऱ्यांनाच आपले प्रश्न मांडण्यासाठी पंतप्रधान वेळ देत नाही. हे शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे. कांद्यावरील निर्यात बंदी कोणत्याही अटी शर्ती शिवाय सुरू करावी. तसेच कांदा निर्यात बंदीपासून मागील नऊ महिन्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी दरातील फरक म्हणून सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही दिघोळे यांनी केली. 

भारत दिघोळेंना सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात केलं स्थानबद्ध

पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यासाठी सभा आयोजित  करण्यात आली होती. सभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांना सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते. पोलिसांनी सकाळपासूनच त्यांना पोलिस ठाण्यात नजरकैद ठेवले आहे. यानंतर दिघोळे यांनी एक प्रेसनोट प्रसिद्ध करत त्यांची भूमिका मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना वेळ देत नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

रात्रभर दिघोळे यांच्या नाशिकमधील निवासस्थानी पोलिस

मंगळवारी (14 मे रोजी) दुपारी पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी घरी जाऊन भारत दिघोळे यांना कलम149 अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. काल रात्रभर दिघोळे यांच्या नाशिकमधील निवासस्थानी पोलिस निगराणी ठेवण्यात आली होती. तर आज सकाळीच एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे हवालदार भगवान शिंदे, रोशन गायकवाड, प्रकाश उंबरकर यांनी भारत दिघोळे यांना घरातून ताब्यात घेतले. तसेच त्यांना सिन्नर पोलिस ठाण्यात स्थानबध्द केले. दिवसभर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या निगराणीत ठेवण्यात आले.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा संपल्यानंतर भारत दिघोळे यांना सोडून देण्यात आले आहे. 

राज्यात कांद्याच्या दराच्या मुद्द्यावरुन शेतकरी आक्रमक 

सध्या राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. यावेळी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी वेळ द्यावा. कांद्याच्या मुद्यावर तोडगा काढावा अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या सभेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.  

महत्वाच्या बातम्या:

PM Modi: हिंदू-मुस्लीम भेदभाव केला तर मी सार्वजनिक जीवनात राहण्याच्या पात्रतेचा उरणार नाही, 'त्या' वक्तव्यावर पंतप्रधान मोदींचं स्पष्टीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget