(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगलीतील आटपाडीचे सुपुत्र एअर कमोडोर सुहास भंडारे यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक प्रदान
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र, पत्रकार प्रशांत भंडारे यांचे जेष्ठ बंधू एअर कमोडोर सुहास भंडारे यांनी आपल्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात उल्लेखनीय कामगिरी केली.
सांगली : आटपाडीचे सुपूत्र एअर कमोडोर सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाईदलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशिष्ठ सेवा पदक प्रदान करण्यात आलंय. हवाईदल प्रमुख वी.आर.चौधरी यांच्या हस्ते सुहास भंडारे यांना हे विशिष्ठ सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनी विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते. दिल्ली येथे हवाईदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताच्या तिन्ही दलांचे प्रमुख बिपीन रावत यांच्या उपस्थितीत भारतीय हवाईदल प्रमुख वी.आर. चौधरी यांच्या हस्ते हे विशिष्ठ सेवा पदक एअर कमोडोर सुहास भंडारे यांना प्रदान करून गौरविण्यात आले. एअर कमोडोर सुहास भंडारे यांनी आपल्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुहास भंडारे यांना विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते.
33 वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात उल्लेखनीय कामगिरी
आटपाडी येथील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र, पत्रकार प्रशांत भंडारे यांचे जेष्ठ बंधू एअर कमोडोर सुहास भंडारे यांनी आपल्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात उल्लेखनीय कामगिरी केली. माणदेशातील आटपाडी या छोट्याशा तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाईदलात मिळालेल्या संधीचे चीज केले आहे. नियुक्ती झालेल्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुहास भंडारे यांना विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते. हवाईदल प्रमुख वी.आर.चौधरी यांच्या हस्ते सुहास भंडारे यांना हे विशिष्ठ सेवा पदक देऊन सन्मानित केले. पुणे येथील सेव्हन टेट्रा स्कुलच्या प्राचार्यपदी आणि पुणे येथील एअरफोर्स तळावर नाईन बी.आर.डी. चे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.सध्या ते दिल्ली येथे सेवा बजावत आहेत.
देशासाठी योगदान देता आल्याचे सुहास भंडारे समाधान
एअर कमोडोर सुहास भंडारे यांचे शिक्षण आटपाडी मधील श्री भवानी विद्यालय आणि राजारामबापू हायस्कुलमध्ये झाले. त्यामुळे
शालेय जीवनात श्री भवानी विद्यालय आणि राजारामबापू हायस्कुल या आटपाडी येथील सर्व शिक्षकांनी समर्पित भावनेने दिलेले ज्ञान आणि आई (स्मिता भंडारे), वडील (प्रभाकर भंडारे) यांनी केलेले संस्कार, पत्नीची (प्रीती भंडारे) समर्थ साथ आणि कामाप्रती ठेवलेली श्रद्धा या शिदोरीच्या जोरावर हे विशिष्ठ सेवा पदक मिळाल्याचे सांगत देशासाठी योगदान देता आल्याचे समाधान वेगळेच आहे अशी प्रतिक्रिया एअर कमोडोर सुहास भंडारे यांनी दिलीय.