पोलादपूर दुर्घटना: राष्ट्रपती, पंतप्रधान, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख
पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात खासगी बस अपघाताबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान कार्यालय आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पोलादपूर बस दुर्घटना : रायगड : पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात खासगी बस 800 फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान कार्यालय आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "रायगडमधील भीषण बस अपघाताची माहिती समजल्यानंतर दु:ख झालं. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे."
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात झालेल्या बस अपघाताचे वृत्त ऐकून फार दुःख झाले.अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मदतकार्य सुरु आहे.शोकाकुल परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत.जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.- राष्ट्रपती कोविंद
— President of India (@rashtrapatibhvn) July 28, 2018
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात बस अपघातात जीव गमावलेल्यांप्रती तीव्र दु:ख व्यक्त केलं. मृतकांच्या कुटुंबीयांचं सांत्वनही पंतप्रधान कार्यालयाने केलं आहे.
Pained by the loss of lives due to a bus accident in Maharashtra's Raigad district. My condolences to those who lost their loved ones: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 28, 2018
काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पोलादपूरजवळील बस अपघाताबद्दल ट्वीट करत दु:ख व्यक्त केल. भीषण बस अपघातात मृतांची माहिती मिळाल्यानंतर दु:ख झालं. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनस्थळी जाऊन सर्वोतपरी मदत करण्याचं आवाहनही राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये केलं आहे.
I'm sorry to hear about the terrible bus accident in Raigad, Maharashtra in which a large number of people have been killed and many others injured. I appeal to Congress party workers in the area to provide all possible assistance to the injured & families of those who have died.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 28, 2018
पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. धक्कादायक म्हणजे जो कर्मचारी वाचला, त्याने खोल दरीतून वर येत, मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करुन झालेल्या अपघाताची माहिती दिली. प्रकाश सावंत-देसाई असं या अपघातातून बचावलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. प्रकाश सावंत देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक आहेत.
या अपघातातून आणखी एक कर्मचारी बचावला. नुकतंच लग्न झालेल्या प्रविण रणदिवे यांनी ऐनवेळी पिकनिकला जाणं टाळलं. त्यांना पत्नीने न जाण्याची विनंती केल्याने, त्यांनी ही पिकनिक टाळली.
पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया
प्रविण रणदिवे हे सुद्धा कोकण कृषीविद्यापीठाचे कर्मचारी आहेत. ते सुद्धा या पिकनिकला जाणार होते. मात्र नुकतंच लग्न झालेल्या प्रविण यांना त्यांच्या बायकोने न जाण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी तब्येत बरी नसल्याचं कारण देत पिकनिकला जाणं टाळलं होतं.
प्रविण रणदिवे यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला असता ते म्हणाले, “टीव्हीवरुनच दुपारी 12.30 वाजता अपघाताची माहिती मिळाली. या वृत्ताने अतिशय दु:ख झालं. मी आज सकाळी साडेसहा वाजता सहकाऱ्यांना कॉल केला, तेव्हा तब्येत बरी नसल्याने आपण पिकनिकला येत नसल्याचं सांगितलं. सहकाऱ्यांनी पिकनिकचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. नऊ वाजेपर्यंत चॅटिंग सुरु होतं, पण त्यानंतर कॉन्टॅक्ट झाला नाही”
या अपघातातून एक कर्मचारी आश्चर्यकारकरित्या बचावला. त्या कर्मचाऱ्याने घाटातून वर येऊन या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक संजय भावे यांनी दिली.
आमची बस दरीत कोसळली, अशी माहिती देसाई नावाच्या कर्मचाऱ्याने विद्यापीठात फोन करुन सांगितलं, असं संजय भावे यांनी एबीपी माझाला सांगितलं.
रेंज आली आणि अपघातातून वाचल्याचा थरार कळवला
या अपघातातून एक कर्मचारी आश्चर्यकारकरित्या बचावला. हा कर्मचारी कसाबसा 800 फूट दरीतून आला. वर आल्यानंतर रस्त्यावर त्याच्या मोबाईलला रेंज आली, त्यानंतर त्याने सर्वात आधी या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली. आमची बस दरीत कोसळली, आम्हाला मदत करा, अशी माहिती प्रकाश सावंत-देसाई या कर्माचाऱ्याने दिली.
या अपघाताची माहिती त्या कर्मचाऱ्याने दिली नसती, तर हा अपघात झालाय हे समजण्यास अनेक तास-दिवस लागले असते. कारण अपघात झाला, ते ठिकाण अवघड वळणाचं किंवा अपघातग्रस्त ठिकाण नव्हतं.
वाचलेल्या कर्मचाऱ्याने अपघाताची माहिती मिळाल्यानंतर, दापोली कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्वात आधी महाबळेश्वर पोलीस आणि पोलादपूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांना नेमका अपघात कुठे झाला, हेच कळत नव्हतं. बस नेमकी कुठून खाली कोसळली आणि ती बस दरीत कुठे आहे, हेच शोधण्यात पोलिसांचा वेळ गेला. अखेर पोलिसांना बस कोसळलेलं ठिकाण आणि ठिपक्याएवढी बस दिसली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं.
संबंधित बातम्या
पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 32 जणांचा मृत्यू
प्रकाश देसाई दरीतून वर आले, रेंज आल्यावर अपघाताची माहिती दिली!
पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया