एक्स्प्लोर

राज्यात बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, लातूरमध्ये एकाचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात दुपारपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होतं. वातावरणात प्रचंड उकाडा वाढला होता. लातूर शहर आणि परिसर, ग्रामीण भाग यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

लातूर : पूर्व मोसमी पावसाने लातूर जिल्ह्यात थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील नणंद गावात घडली. दुपारपासूनच लातूर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होतं. वातावरणात प्रचंड उकाडा वाढला होता. लातूर शहर आणि परिसर, ग्रामीण भाग यात पावसाच्या हलक्या सरी  बरसल्या. मात्र निलंगा तालुक्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.यात नणंद या गावाच्या शिवारातील शेतकरी नारायण लादे यांच्यावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. घरावरचे पत्रे उडून शेतकऱ्यांचं नुकसान वाऱ्याचा जोर जास्त असल्याने अनेक झाडे पडली, तसेच एक मोबाईल टॉवरही कोसळला. वाऱ्याचा जोर वाढल्याने घरावरील पत्रे उडून गेले आहेत. बोटकूळ गावात घरावरचे पत्रे उडून गेल्याने शेतकऱ्यांचा गुळ भिजून लाखोंचं नुकसान झालं आहे. कोकणातही पावसाची हजेरी कोकणातही पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह पाऊस झाला. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तर जिल्ह्यातील अन्य भागात ढगाळ वातावरण आहे. उकाड्यापासून दिलासा विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातून सध्या उष्णतेच्या लाटीने काही प्रमाणात माघार घेतल्याची माहितीही स्कायमेटने दिली. विदर्भातील ठराविक भागात अजूनही उष्णतेचा तडाखा कायम आहे . मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जास्त उष्णता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण विदर्भाच्या काही भागांत हलकासा पाऊस झाल्यामुळे कमाल तापमानामध्ये घट झाली. त्यामुळे सध्या तेथील तापमान 40 अंशांपर्यंत नोंदवलं जात आहे. रविवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून 24 तासात नागपूर येथे 35.8 मिमी, सातारा 33 मिमी, कोल्हापूर 7 मिमी, तर वर्धा येथे 1.6 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असल्याची माहिती स्कायमेटने दिली. स्कायमेटच्या अंदाजानुसार, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे वारे सध्या मध्य प्रदेशाकडून विदर्भ ओलांडून दक्षिण मध्य महाराष्ट्रकडे वाटचाल करत आहे. यामुळे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागांत आणि विदर्भातील काही भागांत पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 ते 48 तासात महाराष्ट्रातील उष्ण लाट सर्व ठिकाणची कामी होऊन तापमानामध्ये सुध्दा घट होईल. दक्षिण महाराष्ट्रामध्ये 30 मे पासून मोसमी पावसाचं आगमन होईल, अशी अपेक्षा आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचं आगमन होऊ शकतं, असं स्कायमेटने म्हटलं आहे. केरळात मान्सूनचं आगमन पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने दिली. दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जूनला धडकतो. मात्र, यंदा दोन ते तीन दिवस आधीच केरळात दाखल झालाय. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील 24 तासात त्याची वाटचाल दक्षिण-अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण पुढच्या सात दिवसांत तो महाराष्ट्रात धडकतो. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्याने राज्यातही मान्सूनचं वेळेत आगमन होईल असं म्हटलं जात आहे. संबंधित बातमी : केरळात मान्सून दाखल, राज्यातही वेळेत येणार!
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: धाराशिव जिल्ह्यात 7 ते 9 या वेळेत टीव्ही, मोबाईल बंद राहणार
Maharashtra Live blog updates: धाराशिव जिल्ह्यात 7 ते 9 या वेळेत टीव्ही, मोबाईल बंद राहणार
Dharashiv News: भोंगा वाजला कि दोन तास टीव्ही-मोबाईल बंद होणार, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा नवा ‘पॅटर्न’; धाराशिव जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
भोंगा वाजला कि दोन तास टीव्ही-मोबाईल बंद होणार, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा नवा ‘पॅटर्न’; धाराशिव जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
Ashok Kharat : अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Byelection 2026 Candidates: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवारांनी शड्डू ठोकला, कोण-कोण रिंगणात?
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवारांनी शड्डू ठोकला, कोण-कोण रिंगणात?
Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छुक
राहुरी पोटनिवडणुकीसाठी मविआकडून कोण लढणार, ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्येही इच्छुक, प्राजक्त तनपुरेंचा सस्पेन्स कायम
Navi Mumbai Crime: काळी जादू करण्यासाठी सांताक्रुझमधील आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला सांगितलं अन् नको ते केलं, नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश
नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा महिलांवर अत्याचार, मध्यरात्री खालापूरच्या फार्म हाऊसवर न्यायचा अन्...
Donald Trump : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
Ashok Kharat : अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
Embed widget