एक्स्प्लोर

नांदेड पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकरला अखेर बेड्या

एसआरपीएफ पोलिस भरती प्रकरणात अडीच कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप प्रवीण भटकरवर आहे.

पुणे : नांदेड पोलिस घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रवीण भटकरला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एसआरपीएफ पोलिस भरती प्रकरणात अडीच कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप प्रवीण भटकरवर आहे. प्रवीण भटकर हा ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचा पुतण्या आहे. गेले अनेक महिने तो फरार होता. प्रवीण भटकर हा डॉ. विजय भटकर यांच्या कंपनीत काम करत असतानाच ईटीएच या कंपनीत देखील काम करत होता. या ई टी एच कंपनीकडे एस आर पी एफ भरती प्रक्रियाच्या डेटा एन्ट्रीचे काम सोपविण्यात आलं होतं. प्रवीण भटकरने कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पैसे घेऊन उमेदवारांना भरती केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुणे आणि नांदेडमध्ये गुन्हे नोंद आहेत. आतापर्यंत याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. प्रवीण भटकर हा या प्रकरणी अटक झालेला पाचवा आरोपी आहे. ईटीएच कंपनीचे संचालक शशांक हिवरकर आणि अभिजीत कोळस या़ंचीही याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली आहे. काय आहे नांदेडमधील पोलिस भरती घोटाळा? नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीत घोटाळा झाल्याचं मागच्या वर्षी उघडकीस आलं होतं. या प्रकरणी दोघा पोलिसांसह 20 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसात भरती करण्यासाठी उमेदवारांकडून पैसे उकळल्याचं समोर आलं होतं. पोलिस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं होतं. नांदेडसह अन्य चार जिल्ह्यांतील पोलिस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम होतं. दोन पोलीस कर्मचारी, एसएसजीचे दोन कर्मचारी यांच्यासह एकूण 20 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 20 पैकी 12 आरोपींना नांदेड पोलिसांनी अटकही केली होती. प्रवीण भटकरला कठोर शिक्षा करा : विजय भटकर "नांदेडमधील पोलिस भरती घोटाळ्याचा आरोपी प्रवीण भटकरला पकडून त्याला कठोर शिक्षा करा," अशी मागणी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केली होती. तसंच पोलिस भरती घोटाळ्याशी आणि प्रवीण भटकरशी माझा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं होतं. प्रवीण भटकर हा नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. त्याने ओएमआर नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन केली. या कंपनीमार्फत तो डाटा जमा करायचा आणि त्याचा वापर भरतीमध्ये घोटाळा करण्यासाठी करायचा, असा त्यांच्यावर आरोप आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे भटकरच्या फसवणुकीचं जाळं संपूर्ण राज्यभरात पसरलेलं आहे. "प्रवीण भटकर हा शास्त्रज्ञ विजय भटकर यांचा पुतण्या असल्याचा म्हटलं जात होतं. परंतु प्रवीण भटकरशी काहीही संबंध नसून त्याने माझ्या नावाचा उपयोग केला," असं विजय भटकर यांनी सांगितलं. स्पेशल रिपोर्ट : पोलिस भरतीत घोटाळा, जिल्ह्या-जिल्ह्यातून 'माझा'चा रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Embed widget