एक्स्प्लोर

सतरा दिवसाच्या थकव्यानंतर आज विठुराया जाणार झोपायला, आज विठूरायाची प्रक्षाळ पूजा

कोरोना  संकटामुळे विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी देवाच्या जोडीने गेली 17 दिवस अहोरात्र  उभी असलेली जगन्माता रुक्मिणी मातेचीही आज पवमान अभिषेकाने प्रक्षाळ पूजा करण्यात आली.

पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांना सलग 17 दिवस अहोरात्र दर्शन देत उभ्या असलेल्या परब्रह्म पांडुरंगाला आजपासून नियमित विश्रांती मिळणार असून देवाच्या प्रक्षाळ पूजेनंतर राजोपचाराला आजपासून सुरुवात झाली. देवाचा थकवा आणि शिणवटा घालविण्यासाठी ही प्रक्षाळ पूजा करायची शेकडो वर्षाची परंपरा आहे. आज भल्या पहाटे  विठुरायाच्या चरणाला  लिंबू आणि साखर चोळून ठेवण्यात आली . यांनतर संपूर्ण मंदिर धुवून साफ करण्यात आले. दुपारी देवाच्या प्रक्षाळ पूजेस सुरुवात झाली . मंदिर समितीचे सदस्य डॉ दिनेश कदम यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची पूजा करण्यात आली.  या पूजेत पारंपरिक पद्धतीने ब्रह्म वृंदांच्या उपस्थितीत मंत्रपठण करीत देवाला गरम पाण्याने रुद्राभिषेक करण्यात आला .  

 रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नान झाल्यावर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह  प्राप्त होत असल्याची भावना वारकरी संप्रदायात असते. रुक्मिणी मातेची पूजा मंदिर समिती सदस्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर देवाला मखमली निळी अंगी , कमरेला शेला आणि गुलाबी रंगाचे  धोतर नेसवून 30 पद्धतीचे मौल्यवान पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले .  यात  मस्तकी सुवर्ण मुकुट, गळ्यात अनमोल कौस्तुभ मणी, भाळी निळ्या हिऱ्यांचा नाम, दंडाला दंड पेट्या आणि गळ्यात अत्यंत मौल्यवान मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, तीन पदरी सुवर्ण तुळस माळ, मारवाडी पेठ्यांचे हार, मोठा लफ्फा आणि मोत्याचे कंठे घालण्यात आले. कानाला हिरेजडीत मस्य जोड अशा पोशाखात नटलेल्या विठुरायाचे सौंदर्य अतिशय खुलून दिसत होते. रुक्मिणी मातेलाही वाक्या, तोडे, तानवड, मोहरा आणि पुतळ्यांच्या माळा, हायकोल, चिंचपेटी व पुतळ्याची माळ असे पारंपारिक दागिन्यांनी सजविण्यात आले होते. या पूजेनंतर देवाला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात आला आणि देवाची महाआरती करण्यात आली.

 कोरोना  संकटामुळे विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी देवाच्या जोडीने गेली 17 दिवस अहोरात्र  उभी असलेली जगन्माता रुक्मिणी मातेचीही आज पवमान अभिषेकाने प्रक्षाळ पूजा करण्यात आली. यावेळी रुक्मिणी मातेलाही हिरे मणक्यांच्या पारंपरिक दागिन्याने सजविण्यात आले होते.  अखंड परिश्रमानंतर आजपासून  देव आपल्या शयनकक्षात विश्रांतीसाठी जाणार असल्याने आज देवाचा पलंग बसविण्यात आला. सुगंधी फुलांनी मंदिर आणि देवाचे शयनकक्ष सजविण्यात आला होता. सासवड येथील माळी समाजाच्या वतीने ही सेवा गेली अनेक वर्षे करण्यात येते. देवाचा शिणवटा घालविण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनविण्यात आलेला 14 आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा देवाला देऊन देवाची शेजारती होऊन देव विश्रांतीला गेले. देवाला हे सर्व उपचार होत असताना देवाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जात असल्याची अनुभूती पदोपदी जाणवत राहते . सुरुवातीला थकलेला देवाचा चेहरा पूजेनंतर मात्र अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न झाल्याचे पाहावयाला मिळते . उद्यापासून विठ्ठल रुक्मिणीचे राजोपचार नियमितपणे सुरु होणार आहेत . 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
PMC Election 2026: पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
Embed widget