सत्ता आली तर सरसंघचालक मोहन भागवत यांना जेलमध्ये टाकू : प्रकाश आंबेडकर
बिहारमधील एका खासदाराला एके 47 बाळगल्याप्रकरणी जेलमध्ये जावं लागलं आहे. मोहन भागवत यांच्याकडेही एके 47 आहे. त्यांच्याकडे एके 47 कशी आली? हे सांगू शकले नाहीत तर त्यांनाही जेलमध्ये पाठवू असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
औरंगाबाद : सत्ता आली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांना दोन दिवसासाठी तरी जेलमध्ये टाकू असं, म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा संघावर निशाणा साधला आहे. औरंगाबाद येथील मुस्लीम समाज कार्यकर्ता प्रवेश सोहळा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
बिहारमधील एका खासदाराला एके 47 बाळगल्याप्रकरणी जेलमध्ये जावं लागलं आहे. मोहन भागवत यांच्याकडेही एके 47 आहे. त्यांच्याकडे एके 47 कशी आली? हे सांगू शकले नाहीत तर त्यांनाही जेलमध्ये पाठवू, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. सामान्य माणूस आणि आरएसएसच्या लोकांना सारखाच कायदा लागू झाला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली.
या भाषणादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर देखील टीकास्त्र सोडलं. काँग्रेसमध्ये काही लोकांनाच जानवे घालण्याचा अधिकार असून बाकीच्यांना नाही. आपण लोकसभा निवडणुकीत 3 ते 4 वेळा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा काँग्रेसने हारलेल्या जागा मागितल्या होत्या. मात्र पक्षाने त्याला नकार देत सेक्युलर मतदान दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप त्यांनी केला.