एक्स्प्लोर
औरंगाबादेत प्रहार संघटनेची तोडफोड, गटविकास अधिकाऱ्यांनाही मारहाण
औरंगाबादेत पंचायत समितीच्या कार्यालयात गट विकास अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे.

औरंगाबाद : औरंगाबादेत पंचायत समितीच्या कार्यालयात गट विकास अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे. ग्रामसेवक गैरहजर असल्यानं ही मारहाण केल्याचं समजतं आहे. मारहाणीसोबतच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गट विकास अधिकारी कार्यालयाचीही तोडफोड केली आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिथं असणाऱ्या खुर्चांही त्यांनी इतरत्र फेकल्या. तसंच बीडीओ एम. सी. राठोड यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या आहेत.
आणखी वाचा























