भाजपने शिवसेनेचा तर राष्ट्रवादीने काँग्रेसचा हात सोडायचा हे 2014 मध्येच ठरलं होतं, प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट
भाजपासोबत येण्याची खूप आधीपासून आमची आणि मोठ्या साहेबांची (शरद पवार) देखील इच्छा होती. मात्र, गाडी स्लीप होऊन जात होती असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं.
Praful Patel : भाजपासोबत येण्याची खूप आधीपासून आमची आणि मोठ्या साहेबांची (शरद पवार) देखील इच्छा होती. मात्र, गाडी स्लीप होऊन जात होती असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं. 2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचा आणि भाजपवाल्यांनी शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरलं होतं असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. ते गोंदियात महायुतीच्या वतीने आयोजित सत्कार समारोप कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
2014 च्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी स्वतः बाहेरुन पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होते असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. आमच्या सहकार्याने हरिभाऊ बागडे स्पीकर म्हणून निवडून आले. मात्र, पुन्हा गडबड झाली आणि आम्ही मागे राहून गेलो तुम्ही पुढे निघून गेले असे म्हणत मंचावर बसलेल्या भाजप आमदारांना देखील पटेल यांनी टोला लगावला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचा विचार डोक्यातून काढून टाका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिथं युती होईल तिथं युती करायची, असं आमचं धोरण आहे. त्यामुळं युतीचं (Maha Yuti) डोक्यातून काढून टाका, अशा थेट सूचना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिले आहेत. भंडाऱ्यात (Bhandara) आयोजित कार्मक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी या स्पष्ट सूचना दिल्यात.
जिथे आपली ताकद आहे तिथं आपण विचार केलाचं पाहिजे
प्रभागात आपल्याकडे सक्षम उमेदवार असेल, दुसऱ्याकडे असेल आणि तिसऱ्याकडेही उमेदवार राहू शकतो. अशा स्थितीत आपल्या कार्यकर्त्याला संधी नं देणं, त्याचं मन दुखवण, हे योग्य वाटतं नाही. त्यामुळे जिथे सोयीचं वाटत असेल आपण तिथे बघू. सार्वत्रिक निवडणूक आहे. मतांचा विचार असतो. जिथे आपली ताकद आहे तिथं आपण विचार केलाचं पाहिजे. असं होणार नाही की मागल्या वेळेस तिथं कोणी जर दुसऱ्याचा निवडून आला असेल तर त्यालाचं जागा सोडायची. आपली ताकत असेल तर आपण लढायचं. त्यामुळे आपणच प्रत्येक प्रभागात आपलाच उमेदवार निवडणूक लढेल या विचारांनाच प्रत्येकाने आता कामाला लागलं पाहिजे, असेही खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. आपण गफलतीत राहणार नाही. अशा सूचना देत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्याय. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे बाळासाहेब असताना शिवसेनेत एकत्रच होते. वेगळे झाल्यानंतर आता एकत्र आले तर, काय फरक पडणार आहे असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:






















