एक्स्प्लोर
विवाहबाह्य संबंधातून महिलेची हत्या, शवविच्छेदन कर्मचारी अटकेत
नागपुरातल्या शासकीय रुग्णालय परिसरात एका झुडपामध्ये अर्चना भगत या 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. अर्चनाच्या मानेवर झालेला घाव हा एखाद्या रुग्णालयातल्या तीक्ष्ण हत्यारानेच झाला असावा, असा संशय पोलिसांना आला.

नागपूर : विवाहबाह्य संबंधांतून शवविच्छेदन कर्मचाऱ्याने महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंबापासून आपले संबंध लपवण्यासाठी महिलेला जीवे मारल्याची कबुली आरोपी गुरुदयाल पाठकने दिली आहे.
शनिवारी सकाळी नागपुरातल्या शासकीय रुग्णालय परिसरात एका झुडपामध्ये अर्चना भगत या 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. अर्चनाच्या मानेवर झालेला घाव हा एखाद्या रुग्णालयातल्या तीक्ष्ण हत्यारानेच झाला असावा, असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा तपास सुरु केला.
अर्चनाची गुरुदयालशी मैत्री असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर अवघ्या आठ तासांच्या आतच गुरुदयाल पाठकला अटक करण्यात आली. पत्नीला अर्चनासोबतच्या मैत्रीविषयी समजल्यामुळे आमच्यात तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे तिचा काटा काढल्याची कबुली गुरुदयालने दिली. रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या तीक्ष्ण ब्लेडनी हत्या करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
