एक्स्प्लोर
Advertisement
उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला एसटी प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
एसटीच्या अघोषित संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे निर्णय घेतला आहे.
मुंबई : एसटीच्या अघोषित संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे निर्णय घेतला आहे.
एस.टीच्या सर्व 1010 कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती करण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची 1 जुलै 2018 पासून नव्याने नियुक्ती केली जाईल.
हे रोजंदारी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता तरी देखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळेच एस.टीचे आर्थिक नुकसान झाले होते तर प्रवाशांची प्रचंड गैरसोय देखील झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अशा सर्व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली होती.
सेवा समाप्तीचा हा निर्णय मागे घेण्याबाबत झालेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय मागे घेण्याबाबतचे निदेश परिवहन मंत्र्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या आदेशाचे पालन करत अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचे निश्चित केले असून यासंदर्भातील परिपत्रक दि. 25 जून 2018 रोजी निर्गमित केले आहे.
या परिपत्रकाप्रमाणे ज्या चालक तथा वाहक (कनिष्ठ), सहाय्यक लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) यांनी दि. 8 जून 2018 व दि. 9 जून २०१८ रोजी झालेल्या अघोषित संपात सहभाग घेतला आहे व ज्यांची सेवा विभाग/ घटक प्रमुख यांनी समाप्त केली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०१८ पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement