एक्स्प्लोर

शिक्षणमंत्र्यांच्या मागे हा कशाचा तळतळाट?, राजकीय परीक्षेत फेल होण्याचा अनोखा योगायोग

'एकूण काय तर राज्यातल्या शिक्षकांचा तळतळाट लय बेक्कार' अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवी दिल्ली : भाजपच्या यादीत ज्या दिग्गजांचा पत्ता कट झाला, त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे विनोद तावडे. तावडेंचं तिकीट कापण्याचं कारण काय, याच्यावर जोरदार चर्चा सुरु आहेत. पण अनेकांना यात महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आणि त्यांच्या पराभवांमधली एक समान लिंकही दिसत आहे. त्या संदर्भात पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वसंत पुरके, राजेंद्र दर्डा, आणि आता विनोद तावडे. हे तिघेही महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राहिलेले आहेत. हे मंत्रीपद सांभाळल्यानंतर वसंत पुरके, राजेंद्र दर्डा या दोघांनाही पराभवाचा झटका बसला होता. तर विनोद तावडेंना तर विधानसभेचं तिकीटच नाकारलं गेलं आहे. 'एकूण काय तर राज्यातल्या शिक्षकांचा तळतळाट लय बेक्कार', 'तिसऱ्या लिस्टमध्ये नाव नाही आल्यावर कसं वाटतंय' अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राज्यातलं शिक्षणमंत्रीपद हे गेल्या काही काळात अनेकदा वादग्रस्त राहिलं आहे. त्याला तावडेही काही अपवाद राहिले नाहीत. शिक्षक भरतीचा विषय प्रलंबित राहिला, अधिकच्या 20 गुणांची पद्धत त्यांनी बंद केल्यानं मोठा वाद झाला. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या अजेंड्यावर तावडे कायम राहिले. आपलं काय चुकलं याचं आत्मपरीक्षण करु असं ते आता म्हणत आहेत. आघाडी सरकारच्या काळात वसंत पुरके हे राज्याचे शिक्षणमंत्री होते. शिक्षकांसाठी अशैक्षणिक कामांची सुरुवात त्यांच्याच काळात झाल्याचा आरोप होतो. अनेक वाद झाल्यानंतर त्यांचं खातं बदलण्यात आलं. यवतमाळमधला राळेगाव हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ. सलग चारवेळा निवडून येणाऱ्या पुरकेंना 2014 मध्ये मात्र पराभवाचा झटका बसला होता. पुरके यांच्यानंतर राजेंद्र दर्डा हे त्यानंतर राज्याचे शिक्षणमंत्री बनले. 2014 मध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून त्यांनाही पराभवाचा झटका बसला होता. त्यामुळे पुरके, दर्डा, आणि आता तावडे. शिक्षणमंत्री बनलेले हे नेते आपल्याच राजकीय परीक्षेत फेल होते गेलेत. आता याला अनोखा योगायोग म्हणायचं नाही तर काय म्हणायचं.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget