एक्स्प्लोर
लातुरात भीषण पाणी टंचाई, पाण्याच्या टाक्यांना पोलीस संरक्षण
लातूर : लातुरात पाण्यासाठी टाकीवर टँकरसाठी होणारे तंटे लक्षात घेता, पाण्याच्या टाकीच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. एका कॉन्स्टेबलसह 6 होमगार्ड पाण्याच्या टाकीजवळ तैनात करण्यात आले आहेत.
एरवी मोठमोठ्या गुन्ह्याचा तपास करणारे तसंच मोठ्या मंत्र्यांच्या सुरक्षेची जाबाबदारी पार पाडणारे हे पोलिस सध्या पाण्याला सुरक्षा देत आहेत. लातुरात पाण्यासाठी होणाऱ्या संघर्षात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
पाण्यासाठी चिडलेल्या लोकांनी याआधीच पाण्याच्या टाकीवर चढून आपला रोष व्यक्त केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात कलम 144 लागू केलं होतं.. या कलमाची मुदत 1 एप्रील रोजी संपल्यानं पाण्याच्या टाकीवर जाऊन गोंधळ घालण्याचा प्रकार वाढला होता. त्यामुळे वाद टाळण्यासाठी हा बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर लातुरातीला नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्यांना टाळं ठोकलं आहे. लातूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, हे या सर्व प्रकारातून दिसून येतं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement