एक्स्प्लोर
जुगार अड्ड्यावर छापा, भीतीपोटी एकाची दुसऱ्या मजल्यावरुन उडी
शनिवारी रात्री सांगली पोलिसांनी जुगार एका अड्ड्यावर छापा टाकला. छाप्याच्या वेळी जुगारी व पोलिसांमध्ये पळापळ आणि धरपकड सुरु झाली. याचदरम्यान एका जुगाऱ्याने पोलिसांच्या हातून निसटण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली.

सांगली : शनिवारी रात्री सांगली पोलिसांनी जुगार एका अड्ड्यावर छापा टाकला. छाप्याच्या वेळी जुगारी व पोलिसांमध्ये पळापळ आणि धरपकड सुरु झाली. याचदरम्यान एका जुगाऱ्याने पोलिसांच्या हातून निसटण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. यामध्ये तो जुगारी जबर जखमी झाला आहे. सांगली पोलिसांनी काल रात्री झुलेलाल चौकातील लॉजमधील जुगार अड्डावर छापा घातला. छाप्यानंतर जुगारी इकडे-तिकडे पळू लागले. पोलिसांकडून सर्व जुगाऱ्यांची धरपकड सुरु झाली. त्यावेळी एका जुगाऱ्याने त्याच इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली आहे. रोहन गाडगे असे त्या उडी मारणाऱ्याचे नाव असून पळून जाण्यासाठी त्याने २० फुटांवरून खाली उडी मारली. यामुळे रोहन जागीच बेशुद्ध पडला. यानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांनी जखमी रोहनला शुद्धीत आणत तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु पोलिसांनी या घटनेचे खंडन करत पोलिसांचा छापा आणि जुगाऱ्याने इमारतीवरून मारलेल्या उडीचा काही संबंध नसल्याचे म्हंटले आहे. दरम्यान या जुगार अड्डावरील छाप्यात जुगार खेळणाऱ्या 10 ते 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाचा : सांगलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक
आणखी वाचा























