एक्स्प्लोर
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या सिंदखेड राजामधील सभेला परवानगी नाकारली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिंदखेड राजामधील सभेला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली आहे.

फाईल फोटो
बुलडाणा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिंदखेड राजा इथल्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सभेला परवानगी नाकारण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं येत्या 12 जानेवारी रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सिंदखेड राजा इथं येणार होते. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त केजरीवालांच्या उपस्थितीत शेतकरी मेळ्याव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पण आता पोलिसांनी कार्यक्रमाला परवानीच नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानंतर आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन सुरु केलं आहे.
आणखी वाचा























