एक्स्प्लोर
पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची गोळी झाडून आत्महत्या
मोना विनोद चव्हाण असं या महिलेचं नाव आहे. मोना यांचे पती विनोद चव्हाण हे येरमाळा पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

उस्मानाबाद : पतीच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळात घडली आहे. मोना विनोद चव्हाण असं या महिलेचं नाव आहे. मोना यांचे पती विनोद चव्हाण हे येरमाळा पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. आज सकाळी मोना यांनी पतीच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर तातडीने त्यांना बार्शीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, मोना यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, मोना चव्हाण यांच्याकडून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















