एक्स्प्लोर

चंद्रपुरात दारु तस्करांनी पोलीस अधिकाऱ्याला गाडीखाली चिरडलं

पोलीस उपनिरिक्षक छत्रपती चिडे यांचं यामध्ये निधन झालं आहे. चिडे हे नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस सेवेतील चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना गेल्याच महिन्यात पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं.

चंद्रपूर : चंद्रपुरात अवैध दारुने भरलेल्या गाडीनं पोलीस उपनिरिक्षकाला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस उपनिरिक्षक छत्रपती चिडे यांचं यामध्ये निधन झालं आहे. चिडे हे नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस सेवेतील चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना गेल्याच महिन्यात पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं.

चंद्रपूर जिल्ह्यात गेली चार वर्षे दारूबंदी आहे. मात्र ही दारूबंदी डावलून लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करी केली जाते. मात्र दारु तस्करांची हिंमत वाढल्याने आता पोलीस अधिकाऱ्यांना चिरडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

छत्रपती चिडे पहाटे 4 वाजताच्या सुमारास मौशी-चोरगाव येथे पेट्रोलिंग करत होते. एका वाहनातून अवैध दारू येत असल्याची माहिती चिडे यांना मिळाली होती. त्यानुसार आपल्या चार सहकाऱ्यांसह चिडे यांनी एक संशयित स्कॉर्पिओ गाडी अडवली.

मात्र पोलिसांना पाहताच स्कॉर्पिओ गाडीने पळून जाण्याच्या प्रयत्न केला. यावेळी स्कॉर्पिओ गाडीने एका ट्रॅक्टरला धडक दिली. दारू तस्करांना पकडण्यासाठी चिडे यांनी स्कॉर्पिओकडे धाव घेतली, मात्र दारू तस्करांनी गाडी रिव्हर्स घेत चिडे यांना गाडीखाली चिरडले. जखमी झालेल्या चिडे यांना तात्काळ ब्रह्मपुरीच्या ख्रिस्तानंद रुणालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर स्कॉर्पिओ वाहन घेऊन आरोपी पसार झाले. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील साहिल शहजाद नावाचा तस्कर या घटनेत प्रमुख आरोपी आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget