एक्स्प्लोर
नागपुरात पोलीस पतीकडून राहत्या घरात वकील पत्नीची जाळून हत्या
नागपुरात पोलीस असलेल्या पतीने वकील पत्नीला चलाखीने राहत्या घरात जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भाजलेल्या पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला. मुलांनी हकीकत सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.
नागपूर : पोलीस असलेल्या पतीने अत्यंत चलाखीने राहत्या घरात वकील पत्नीची जाळून हत्या केली. घरघुती भांडणात तिने स्वतःला जाळून घेतलं आणि तिला वाचवताना आपणही भाजल्याचा बनाव केला. पोलीस विभागानेही सुरुवातीला आपल्या कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवला. मात्र, सात आणि तीन वर्षीय चिमुकल्यांनी आई-वडिलांमध्ये त्या रात्री घडलेला सर्व प्रसंग सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.
वकील असलेल्या वैशाली नागमोते 28 सप्टेंबर रोजी वाडी परिसरातील राहत्या घरी 90 भाजल्या गेल्या. गंभीररित्या भाजल्या गेल्यामुळे 30 सप्टेंबरच्या रात्री रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. घरघुती भांडणात पत्नी वैशालीने स्वतःला जाळून घेतल्याचा दावा तिचा पोलीस पती देवेंद्र नागमोतेने (वाहतूक पोलीस शिपाई) केला.
त्या घटनेत देवेंद्रही 40 टक्के भाजला गेल्यामुळे पत्नीला वाचवताना तो भाजला गेल्याचं सर्वांना वाटलं. मात्र वैशालीच्या 7 वर्षीय मुलीने पोलिसांना हकीकत सांगितली. त्यानंतर देवेंद्रचा खरा चेहरा जगासमोर आला. रोज दारू पिऊन घरी आल्यानंतर वडील आईला जबर मारहाण करायचे. त्या दिवशी वडिलांनीच आईला रॉकेल टाकून जाळलं, असा दावा सात वर्षीय मुलीने केला.
वैशाली नागमोतेंचा पतीकडून सतत छळ
पोलीस असलेला देवेंद्र नागमोते नेहमीच वैशालीला दमदाटी करत क्षुल्लक कारणांवरून मारझोड करायचा. तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. 28 सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास देवेंद्रने दोन्ही मुलं झोपलेले पाहून वैशालीला जोरदार मारहाण सुरु केली. आवाज ऐकून सात वर्षीय मुलगी जागी झाली. मात्र वडिलांच्या भीतीने झोपेचं सोंग करत पडून राहिली. थोड्या वेळाने तिने वडिलांना आईला रॉकेल टाकून पेटवताना पाहिलं.
गंभीररित्या भाजलेल्या वैशालीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र 30 सप्टेंबरच्या रात्री वैशालीची मृत्यूशी झुंज संपली. रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. 28 ते 30 सप्टेंबर या काळात देवेंद्रने सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वतःच्या मुलांनीच घडलेला सर्व प्रसंग सांगून जन्मदात्या आईवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
पोलिसांकडून कारवाई करण्यात दिरंगाई?
दरम्यान पोलिसांकडूनही देवेंद्रला वाचवण्याचा प्रयत्न करत केला जात असल्याचा आरोप वैशालीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या मते, रुग्णालयात मृत्यूशी झुंज देताना वैशाली घडलेला प्रकार सांगत होती. मात्र पोलिसांनी तिचा मृत्यूपूर्व जवाब नोंदवण्यात दुर्लक्ष करत जाणीवपूर्वक दिरंगाई केली.
पोलिसांना देवेंद्र नागमोते विरोधात पत्नीच्या हत्येचा गुन्हा नोंदवला. चिमुकल्यांनी डोळ्यांसमोर जन्मदाती आई गमावली आहे. घडलेलं वास्तव सांगत त्यांनी आईला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलिसांनीही आता या चिमुकल्यांचं मातृत्त्व हिरावून घेणाऱ्या देवेंद्रविरोधात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement