एक्स्प्लोर

जेसीबीने बैलाला ठार मारणारे गजाआड; पुरलेला बैल उकरुन केलं शवविच्छेदन

जेसीबीच्या सहाय्याने बैलाला क्रूरपणे जीवे मारणाऱ्या व त्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तसेच बैल खरंच पिसाळला होता का? यासाठी बैलाचे शवविच्छेदन केलं आहे.

पुणे : इंदापूर तालुक्यातील पोंधवडी येथे जेसीबीच्या साहाय्याने क्रूरतेने बैल मारल्याची घटना घडली होती. त्या घटनेची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. शिवाय घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी त्याचा सतत पाठपुरावाही केला. याची दखल घेत गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पुरलेला बैल उकरुन पशुवैद्यकीय विभागाने त्याचे शवविच्छेदन केले आहे. लवकरच बैल पिसाळलेला होता का? याचं उत्तर समोर येईल. गेल्या दोन तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर व्हायरल झालेला जेसीबीच्या साहाय्याने बैलास क्रूरतेने ठार मारलेल्या व्हिडिओने अनेकांची मने पिळवटुन टाकली होती. हा व्हिडिओ नेमका कुठल्या गावचा असा प्रश्न सर्वांना पडला होता. हा व्हिडिओ इंदापूर तालुक्यातील अडवळणी असलेल्या पोंधवडी गावचा आहे. यासंबंधीत बातमी एबीपी माझाने दाखवत यातील गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी त्याचा पाठपुरावाही केला होता. याची दखल घेत यातील आरोपीला अटक केली आहे. जेसीबीने चिरडुन बैलाची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा शोध इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीसांना लागला. गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे आणि भाऊसाहेब आण्णा खारतोडे यांच्याविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला. यात फिर्यादी स्वतः पोलीस बनले. काल यातील रोहित शिवाजी आटोळे यास पोलिसांनी अटक केली. ज्या जेसीबीने बैलास चिरडले तो जेसीबी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर भाऊसाहेब आण्णा खारतोडे याच्या शोधात पोलिस आहेत बैलाला पिसाळलेलं कुत्र चावल्यामुळं बैल पिसाळला होता. त्यामुळं गावातील रस्त्यावरील लोकांच्या पाठीमागे धावणे, समोर येईल त्याला ढुसण्या मारणे, यामध्ये बैलाने चार दुचाकींची मोडतोड केली होती. गावकऱ्यांच्या अंगावरही तो जात होता. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ होऊ नये, म्हणून गावकऱ्यांनी त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. माणुसकीला काळीमा फासणारा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, अखेरीस बैलाचा बळी घेणारा आणि हा व्हिडिओ व्हायरल करणारा समाजासमोर आला. दरम्यान, बैल खरंच पिसाळला होता का? याचे उत्तर शोधण्यासाठी पुरलेला बैल उकरुन पशुवैद्यकीय विभागाने त्याचे शवविच्छेदन केले. संबंधित बातम्या -  नांगरणी स्पर्धा बंद होण्याची भीती,  गुहागरमध्ये प्राण्यांना क्रूरपणे वागवल्याप्रकरणी आमदार पुत्रासह 25 जणांविरुद्ध गुन्हा CCTV VIDEO | मुंबई आयआयटीतील इंटर्न बैलाच्या धडकेत जखमी कुर्बानीला आणलेला रेडा झाला वेडा, वाहनांची तोडफोड Bull murdered brutally | पिसाळलेल्या बैलाची जेसीबीने हत्या केलेल्यांना अटक | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Embed widget