एक्स्प्लोर
VIDEO : उस्मानाबादमध्ये मटका व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पोलिसांचे हफ्ते
शहरात अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी कसे हफ्ते घेतात, हे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. उस्मानाबादमध्ये मटका व्यवसाय चालू ठेवण्यासाठी बुकीने त्याच्या मोबाईलमध्ये पैसे देतानाचा प्रकार कैद केला आहे.
उस्मानाबाद : शहरात अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी कसे हफ्ते घेतात, हे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. उस्मानाबादमध्ये मटका व्यवसाय चालू ठेवण्यासाठी बुकीने त्याच्या मोबाईलमध्ये पैसे देतानाचा प्रकार कैद केला आहे.
राज अहमद मोमीन असं पैसे स्वीकारणाऱ्या या पोलिस निरीक्षकाचं नाव आहे. मोमीन हे मुरुम पोलिस स्टेशनला कार्यरत होते, तोपर्यंत मटका चालवणारी मंडळी नित्यनियमाने हप्ते देत होती. पण मोमीन यांची बदली झाल्यावरही स्टेशन सोडेपर्यंत हप्त्याची मागणी करत होते.
नव्या फौजदारालाही मटका बुकींना हप्ते द्यावेच लागणार होते. त्यामुळे जुन्या फौजदाराला हप्ते दिल्याचं सांगण्यासाठी एक मोमीन यांच्याकडे आला आणि हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement