एक्स्प्लोर
शरद पवारांविषयी बेताल वक्तव्य, चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंचा माफीनामा
'मी वाचलं धक्कादायक निधन देव त्यांच्या आत्म्याला सॉरी सॉरी देव त्यांना उदंड आयुष्य देवो' असं भाष्य चंद्रशेखर गोखले यांनी केलं होतं.
![शरद पवारांविषयी बेताल वक्तव्य, चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंचा माफीनामा Poet Chandrashekhar Gokhale apologies for facebook comment on Sharad Pawar शरद पवारांविषयी बेताल वक्तव्य, चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंचा माफीनामा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/02083816/Chandrashekhar-Gokhale-Sharad-Pawar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह कमेंटबद्दल चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांनी माफी मागितली आहे. शरद पवारांनी केलेल्या दाव्याच्या बातमीवर गोखलेंनी खोडसाळ कमेंट केली होती.
भाजपने बारामतीची जागा जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असा दावा शरद पवार यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत केला होता. या वक्तव्याची अनेक प्रसारमाध्यमांनी बातमी केली होती. अशाच एका वेबसाईटने फेसबुकवर शेअर केलेल्या बातमीच्या पोस्टवरील कमेंटमध्ये चंद्रशेखर गोखलेंनी टवाळपणे कमेंट केली.
'बारामती जिंकण्याच्या भाजपच्या दाव्यानंतर शरद पवारांचं धक्कादायक विधान' असा संबंधित बातमीचा मथळा होता. त्यावर 'मी वाचलं धक्कादायक निधन देव त्यांच्या आत्म्याला सॉरी सॉरी देव त्यांना उदंड आयुष्य देवो' असं भाष्य चंद्रशेखर गोखले यांनी केलं होतं.
गोखलेंच्या कमेंटनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उमटली होती. अनेक जणांनी त्या कमेंटखालीच चंद्रशेखर गोखलेंचा समाचार घेतला, तर कोणी त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर शिव्यांची लाखोली वाहिली. गोखलेंनी माफी मागितली नाही, तर त्यांचा कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.
त्यानंतर, 'मी चंद्रशेखर गोखले मनापासून तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. पवार साहेबांबद्दल असे विधान करायची खरच मला गरज नव्हती तरी माझ्या हातून ही आगळीक घडली प्लीज समजून घ्या' अशा शब्दात चंद्रशेखर गोखलेंनी बुधवारी रात्री माफी मागितली.
![शरद पवारांविषयी बेताल वक्तव्य, चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंचा माफीनामा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/02031325/Chandrashekhar-Gokhale-post.jpg)
![शरद पवारांविषयी बेताल वक्तव्य, चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंचा माफीनामा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/02082922/Chandrashekhar-Gokhale-2.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)