मी एकदा नऊ पुरण पोळ्या खाल्या होत्या... अशोक नायगावकरांनी किस्सा सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ
Ashok Naigaonkar : जेष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर (Ashok Naigaonkar) यांचा त्यांना 75 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.
मुंबई : नायगावकर साहित्य आणि व्यक्ती या कार्यक्रमात जेष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर (Ashok Naigaonkar) यांचा त्यांना 75 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अशोक नायगावकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. मी एकदा नऊ पुरणपोळी खाल्ल्या होत्या, म्हणून मी वाईचा आहे हे सांगत नाही, असा एक किस्सा वायगावकर यांनी सांगताच हॉलमध्ये एकच हाशा पिकला.
हास्य कवी अशोक नायगावकर यांना 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक किस्से सांगितले. ते म्हणाले, " माझ्या सत्काराच्या कार्यक्रमाला आज एवढे लोक जमले आहेत हेच मला आश्चर्य वाटत आहे. नाहीतर मुंबईत आज काल जितका छोटा हॉल तितका मोठा वाटतो. आता इतके लोक लिहितात, कविता करतात तर निदान एका वर्षी प्रत्येक प्रकाराला किमान 3 ते 4 पुरस्कार जाहीर करायला हवेत. तरच नव-नवीन साहित्याची निर्मिती होईल. आधीच्या काळी जो ब्राह्मणी चेहरा होता तो आता बदलत चालला आहे, आता सर्व समावेशक होत आहे,"
नायगावकरांची मिश्किल टिप्पणी आणि सभागृहात एकच हाशा
अशोक नायगावकरांनी यावेळी अनेक किस्से सांगितले. त्यांच्या या किश्यांवर सभागृहात एकच हास्यकलोळ झाला. "तुम्हाला माहित नाही, राजकीय पक्षात फक्त मतभेद नाही आमच्यात पण खूप मतभेद आहेत, अशी मिश्किल टीप्पणी करताच सभागृहात उपस्थित होक जोरजोराने हासू लागले. नायगावकरांनी पुरपोळ्याचा एक किस्सा सांगितला. मी एकदा नऊ पुरणपोळी खाल्ल्या होत्या, म्हणून मी वाईचा आहे हे सांगत नाही, असा एक किस्सा वायगावकर यांनी सांगताच हॉलमध्ये एकच हाशा पिकला.
'मराठी भाषा टिकली पाहिजे'
अशोक नायगावकर यांनी यावेळी लंडनधील एक किस्सा सांगितला. "एके दिवशी लंडनच्या हॉटेलमध्ये माझी नात होती. तिला सचिन तेंडूलकर दिसला. त्यावेळी ती त्याला भेटली आणि मराठीत म्हणाली की, मी तुझी मोठी चाहती आहे. हा किस्सा सांगत अशीच मराठी राहिली पाहिजे, अशी अपेक्षा नायगावकर यांनी यावेळी व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या
दोन आमदारांच्या वादात अधिकाऱ्यांचा बळी, कर्जतचे प्रांतअधिकारी आणि तहसीलदार निलंबीत