एक्स्प्लोर
Advertisement
आंदोलनावरुन आल्यावर पीएमसी बँकेच्या खातेदाराचा मृत्यू
संजय गुलाटी असे या खातेदारचं नाव आहे. गुलाटी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, पीएमसी बँकेविरोधात आंदोलन करुन घरी परतले असता काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र (पीएमसी) बँकेत खाते असलेल्या एका खातेदाराचा पैसे अडकल्याच्या चिंतेने मृत्यू झाला आहे. संजय गुलाटी असे या खातेदारचं नाव आहे. गुलाटी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, पीएमसी बँकेविरोधात आंदोलन करुन घरी परतले असता काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
संजय गुलाटी यांचे पीएमसी बँकेच्या ओशिवरा शाखेत खाते होते. त्यांच्या खात्यात ९० लाख रुपये जमा होते. गुलाटी हे जेट एअरवेज मध्ये काम करत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची नोकरी गेली होती. बचत केलेल्या पैशातून ते परिवाराचा उदरनिर्वाह करत असे. या परिस्थितीत आरबीआयने पीएमसी बँकेच्या व्यवहारावर निर्बंध लावले होते. त्यामुळे पीएमसी बँकेत अडकलेले पैसेही काढणं त्यांन शक्य नव्हतं.
गुलाटी सोमवारी पीएमसीच्या खातेधारकांनी निषेध व्यक्त करण्यासाठी काढलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. या आंदोलनात त्यांनी अनेकांना रडताना पाहिलं. आंदोलनानंतर घरी आल्यानंतर काही वेळातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. संजय गुालाटी यांच्यामागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
सोसायटीचे सचिव यतिंद्र पाल म्हणाले की, गुलाटी यांना थायरॉइड शिवाय तब्येतीची कोणतीही तक्रार नव्हती. सोमवारी पीएमसीच्या खातेधारकांनी निषेध व्यक्त करण्यासाठी काढलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. आंदोलनानंतर दुपारी ३.३० वाजता ते घरी आले आणि झोपले. त्यानंतर जवळपास ४.४५ वाजता त्यांनी आपल्या पत्नीला जेवायला वाढण्यास सांगितले. जेवताना अचानक खाली पडले. संजय यांची पत्नी एकटीच घरी असल्याने त्यांनी मला दूरध्वनी केला. त्यानंतर आम्ही संजय यांना कोकीलाबेन रुग्णायात दाखल केले. रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement