एक्स्प्लोर

PM Narendra Modi In Dehu: देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान; सुप्रिया सुळेंचा आरोप

या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भाषणं झाली. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिलं नाही.

पुणे: देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. देहूतल्या मंदिर शिळा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. पण या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन आता सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. पण पीएमओने त्याला काही उत्तर दिलं नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे." 

खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही."

पंतप्रधानांनी हाताने इशारा केला, पण...
देहू येथे आयोजित करण्यात आलेल्या शिळा लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमावर भाजपची छाप असल्याचं दिसून येत होतं. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले हे स्टेजवर उपस्थित होते. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.

राजशिष्टाचाराचा भाग म्हणून अजित पवार उपस्थित
या कार्यक्रमाला राजशिष्टाचाराचा भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पंतप्रधानांच्या स्वागतापासून या कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत अजित पवार उपस्थित होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Maharashtra Live blog updates: ड्रग्ज तस्करीत मुंबई पोलिसांच्या कॉन्स्टेबला रंगेहात अटक; मालवणी पोलिसांची मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: ड्रग्ज तस्करीत मुंबई पोलिसांच्या कॉन्स्टेबला रंगेहात अटक; मालवणी पोलिसांची मोठी कारवाई

व्हिडीओ

Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Embed widget