एक्स्प्लोर
Advertisement
LIVE: साईंच्या दरबारात मोदींचा सन्मान, पंतप्रधानांकडून विकासकामांचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय शिर्डी दौऱ्यावर आहेत. साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी उत्सवाचा आज समारोप होणार आहे.
शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय शिर्डी दौऱ्यावर आहेत. साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी उत्सवाचा आज समारोप होणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच शिर्डीत आले. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शिर्डी विमानतळावर उतरले. त्यानंतर सव्वा दहानंतर मोदी साईंच्या दर्शनाला मंदिरात पोहोचले. सव्वा अकराच्या सुमारास मोदी जनतेला संबोधणार आहेत.
तसेच, राज्यभरात बांधलेल्या घरकुलांपैकी 2० हजार लाभार्थ्यांना या कार्यक्रमात घरकुल वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर साडे बाराच्या सुमारास मोदी शिर्डीतून निघतील.
पंतप्रधान ज्यावेळी साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी येतील, त्यावेळी इतर भविकांनाही दर्शन घेता येणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्य भाविकांना प्रवेश नाकारण्यात येणार अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र पंतप्रधान कार्यलयातूनच भाविकांना त्रास होणार नाही असे नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्यात.
शिर्डी संस्थानचे सुरक्षारक्षक आणि पोलिस कर्मचारी असा 4 ते 5 हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
तृप्ती देसाई ताब्यात
दरम्यान, पुण्याहून शिर्डीला यायला निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शबरीमाला प्रकरणी तृप्ती देसाई या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी जाणार होत्या. तसे त्यांनी नगर पोलिस अधीक्षकांना निवदेनही दिले होते. मात्र, त्याआधीच पुणे पोलिसांनी देसाईंना ताब्यात घेतले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement