एक्स्प्लोर
Advertisement
मोदींचा मेसेज फडणवीसांनी आहे तसा पास केला..!
मुंबई : भाजपसाठी नगरपालिका निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील विजय खूप महत्त्वाचा होता. कारण जे मंत्री निवडणुकीत चांगली कामगिरी करणार नाहीत, त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाका असा थेट आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये पराभव झाला असता, तर पराभवाचं खापर नोटाबंदी या पंतप्रधानांच्या निर्णयावर फोडलं गेलं असतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भाजपमधील सर्व प्रमुख नेते आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीमध्ये दीर्घ चर्चा करण्यात आली. जे परफॉर्मन्स दाखवणार नाहीत, त्यांना घरी जावं लागणार, असं पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचा हाच संदेश सर्व नेत्यांना बैठकीत दिला. त्यामुळे सर्व नेते जिल्ह्यात तळ ठोकून बसले होते.
आता चार टप्प्यातील निवडणुकांनंतर ज्या मंत्र्यांनी परफॉर्मन्स दाखवला नाही, त्यांच्यावर काय कारवाई होणार, किंवा मार्चमध्ये फेरबदल झाल्यास चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होतो.
नगरपालिका निवडणुकीत भाजपची कामगिरी
तब्बल 31 नगरपालिका जिंकून भाजपनं नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली आहे. सोबतच 52 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेसाठी भाजपने आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे.
रविवारी 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं. सरासरी 70 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. भाजपपाठोपाठ 20 नगरपालिका जिंकत काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली.
संबंधित बातम्या :
पंतप्रधानांकडून महाराष्ट्र भाजपचं अभिनंदन, जनतेचे आभार
शिवरायांचे आशीर्वाद, सरकारवरील विश्वासामुळे यश : मुख्यमंत्री
भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष, पाहा कुठे कुठे विजय
नगरपालिका निवडणुकीत कुठे पत्नी हरली, कुठे आई जिंकली
नगरपालिका निवडणुकीत कुठे काय घडलं.. ? काय बिघडलं..?
नगरपालिका निवडणुकीत कमळ फुललं, भाजपचे 52 नगराध्यक्ष
नगरपालिका निवडणूक : तुमचा नगराध्यक्ष कोण?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement