(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान; 2024 मध्येही मोदीच, लावा जोर!
Devendra Fadnavis : शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Devendra Fadnavis on Mamata Banerjee Mumbai Visit : वर्ष 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला बहुमत मिळाले. आता 2024 मध्येही केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सरकार येईल असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न 2019 मध्येही झाले. मात्र, लोकांनी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. आताही 2024 मध्ये असेच होणार असून पंतप्रधान मोदी यांचा विजय होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. काँग्रेसशिवाय आघाडी तयार करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्याकडून सुरू आहे. शरद पवार यांची त्यांना साथ आहे. त्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून विरोधी पक्षांमध्येच सध्या अंतर्गत सामना सुरू आहे. त्यांच्यातील सामना संपल्यानंतर आमच्याशी कोण लढेल हे पाहू अशी टिप्पणीही फडणवीस यांनी केली.
काँग्रेसला बाजू ठेवून ममता बॅनर्जी सत्तेची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहे. शरद पवार यांची त्यांना साथ असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. गोवा, ईशान्य भारतात तृणमूल काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेस नाहीतर आम्ही मुख्यच विरोधी पक्ष आहोत असं दाखवण्याचा तृणमूलचा प्रयत्न असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
पाहा व्हिडिओ: देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार आणि शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा
शिवसेनेवर टीका
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चर्तुवेदी यांनी सावरकरांबाबत केलेल्या टिप्पणीवर शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेचे बेगडी सावरकर प्रेम समोर आलं असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपला विजयी होण्याचा स्ट्राइक रेट पाहावा आणि महाराष्ट्रातून जनतेने कोणाला पळवून लावले हे निवडणुकीत दिसले. आता पुढील निवडणुकीतही दिसून येईल असेही फडणवीस यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Sanjay Raut : मुंबईला ओरबाडून गुजरात आत्मनिर्भर; संजय राऊत यांचा भाजपला टोला
ममता बॅनर्जी यांच्याकडून राष्ट्रगीताचा अपमान? भाजप नेत्याकडून पोलिसात तक्रार
भाजपविरोधी लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे; नाना पटोलेंचे ममता बँनर्जींना उत्तर