एक्स्प्लोर
Advertisement
पिंपरीत टाळ-मृदुंगाचा गजर करत आंदोलन
पुणे: पिंपरी चिंचवडमधील रिंग रोडचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रिंग रोडमध्ये घरं जाणार या भीतीनं हजारो नागरिकांनी आज अनोखं आंदोलन केलं. पालखी सोहळा सुरु असल्याचा धागा धरत, नागरिकांनी टाळ-मृदुंगाचा गजर करत प्राधिकरण कार्यालयावर पालखी मोर्चा काढला.
यावेळी भजन-कीर्तन करुन साकडं घालण्यात आलं आणि पर्यायी मार्ग अवलंबवावा अशी मागणी करण्यात आली.
1987 साली प्रस्ताव ठेवलेला हा मार्ग तीस वर्षांपासून रखडला आहे. तीस किलोमीटरचा हा मार्ग पिंपरी महापालिका हद्दीत 65 टक्के तर प्राधिकरणमध्ये 35 टक्के विभागला गेला आहे.
या मार्गावर अनेक अनधिकृत घरं उभारली गेलीत, ती जमीन दोस्त केली जाणार आहेत. याला नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. मात्र पावसाळ्यात घरं पाडणार नसल्याची माहिती प्राधिकरणाने दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement