एक्स्प्लोर
आयटी इंजिनिअर अंतराच्या मारेकऱ्याला पोलिसांच्या दिरंगाईमुळे जामीन

पिंपरी चिंचवड : महिला अभियंता अंतरा दास हत्या प्रकरणी आरोपी संतोष कुमारला जामीन मंजूर झाला आहे. 90 दिवस उलटूनही आरोपपत्र दाखल न केल्याने न्यायालयाने संतोष कुमारला जामीन मंजूर करत पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं. न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. नार्को टेस्टची तारीख न मिळाल्याने आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याचं उत्तर पोलिसांनी न्यायालयात दिलं. दरम्यान, महिला अभियंता अंतरा दासची डिसेंबर 2016 मध्ये हत्या झाली होती. तळवडे एमआयडीसी परिसरात भर रस्त्यावर रात्री 8:30 च्या सुमारास तिचा खून झाला. याप्रकरणी आरोपी संतोष कुमारला पोलिसांनी बंगळुरुतून अटक केली होती. पिंपरीत तरुणीची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या एकतर्फी प्रेमातून हत्या संतोष कुमारने अंतरा दासची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतं. सुरुवातीला देहू रोड पोलिस याचा तपास करत होते. मात्र नंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आता नार्को टेस्टसाठी एप्रिलअखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेळ मिळणार आहे. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























