एक्स्प्लोर

NIA Raids : स्वातंत्र्य दिनापूर्वी NIA मोठी कारवाई; PFI शी संबंधित अनेक ठिकाणांवर छापा

NIA Raids : एनआयएने आज देशभरात पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित ठिकाणांवर छापा मारला. पाच राज्यातील 14 ठिकाणी ही कारवाई झाली.

मुंबई लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करून शांतता बिघडवण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI) कट हाणून पाडण्यासाठीच्या सतत प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी पाच राज्यांमध्ये छापे टाकले. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यात एनआयए ही कारवाई केली. या पाच राज्यातील 14 ठिकाणी छापे टाकून काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

एनआयएने केरळमधील कन्नूर आणि मलप्पुरम, कर्नाटकातील दक्षिण कन्नड, महाराष्ट्रातील नाशिक आणि कोल्हापूर, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि बिहारमधील कटिहार येथे छापे टाकले. या वेळी एनआयएने डिजीटल उपकरणे, कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. 

दहशतवादी, हिंसाचार आणि तोडफोडीच्या कृत्यांमधून 2047 पर्यंत भारतात इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी पीएफआय प्रयत्नशील असल्याचा आरोप आहे. त्यासाठी PFI कडून कट्टरतावादी विचारांचा प्रसार करण्यासह सशस्त्र प्रशिक्षित तरुणांची संघटना उभी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गृहमंत्रालयाने पीएफआयवर बंदी घातली. तर, दुसरीकडे एनआयएने आपली कारवाई सुरू ठेवली आहे. 

NIA ला संशय आहे की PFI चे हस्तक 'मास्टर ट्रेनर' म्हणून काम करत आहेत. देशाच्या विविध राज्यांमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहेत. कट्टरतावादी PFI केडर्सना शस्त्रे, लोखंडी रॉड, तलवारी आणि चाकू वापरण्याचे प्रशिक्षण देत आहेत.  गुप्तचर आणि तपासात्मक विश्लेषण आणि अंतर्दृष्टीच्या आधारावर, या कॅडर आणि कार्यकर्त्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून विविध राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

हा कट उधळून लावण्यासाठी एनआयए छापे टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. गुप्त माहितीच्या आधारे तपास यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यकर्त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकत आहे.

पीएफआयवर बंदी 

NIA ने एप्रिल 2022 मध्ये दिल्लीत PFI विरोधात गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षी केंद्र सरकारने पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. त्यादरम्यान अनेक पीएफआय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते.

मार्च 2023 मध्ये त्यापैकी 19 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात एक संघटना म्हणून पीएफआयचेही नाव होते.  त्यानंतर, एप्रिल 2023 मध्ये, शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणाऱ्या PFI च्या राष्ट्रीय समन्वयकाविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget