एक्स्प्लोर

...तर पंतप्रधान मोदींच्या कृपेने पेट्रोल 150 रुपयांवरही जाईल, जयंत पाटील यांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे सध्या पेट्रोल प्रति लिटर 118 आणि डिझेलही शंभर रुपयांवर गेले आहे. पुढच्या काही दिवसांत 150 रुपये सुद्धा होईल, असं जयंत पाटील म्हणाले

सांगली : देशात महागाई प्रचंड वाढली आहे. निवडणुका संपल्यावर पेट्रोल-डिझेलचे दर ही वाढले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे सध्या पेट्रोल प्रति लिटर 118 आणि डिझेलही शंभर रुपयांवर गेले आहे. पुढच्या काही दिवसांत 125 रुपये, आणखी काही दिवसांनी 150 रुपये सुद्धा होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. सांगलीतील आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

महागाईची झळ सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात बसत आहे, याचा गांभीर्याने विचार करत देशातील महागाई कमी करण्यासाठी  केंद्र सरकारने काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले. पण कर्नाटक किंवा अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल महाग कसं? जो दुष्काळी कर पेट्रोल वर लावलाय तो अजून का कमी केला नाही या प्रश्नांना मात्र जयंत पाटील यांनी सोयीस्करित्या बगल दिली.

सरकार आणि तपास यंत्रणा ही त्यांच्याच
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी एक उदाहरण दिलं. "क्रिकेटमध्ये वाडेकर इंग्लंडला जाऊन आले. त्यावेळी भारताचा दारुण पराभव झाला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्हाला 11 नाही तर 13 खेळाडूंविरोधात खेळायला लागलं. कारण दोन पंचदेखील आमच्या विरोधात होते. त्याच पद्धतीने केंद्र सरकारची ईडी आणि सीबीआय आमच्याविरोधात आहेत. तसाच प्रकार सध्या देशात चालू आहे," असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं कौतुक
श्रीलंका किंवा अन्य शेजारच्या देशात महागाईची जी परिस्थिती झाली आहे याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "त्यांनी त्याठिकाणी नियोजनबद्ध असं काही केलं नाही, यामुळे महागाई वाढली. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी भारतात 1991 पासून आदर्श अशी अर्थव्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे कोणताही परिणाम भारताला सोसावा लागला नाही. पेट्रोल, डिझेलच्या किंमती जगात वाढल्या, तरीही भारतात लगेच वाढत नव्हत्या. महागाई आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी रिझर्व्ह फंड ठेवला होता. आज तीच व्यवस्था चालू असती, तर भारतातील नागरिकांना सध्याची महागाईची झळ बसली नसती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget