एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेट्रोलची शतकाकडे वाटचाल सुरुच, नांदेडमध्ये 92 रुपये लिटर
राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. तर आठ जिल्हे असे आहेत, जिथे पेट्रोल जवळपास नव्वद रुपये प्रति लिटर आहे.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीपासून कोणताही दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत नाहीत. कारण, पेट्रोल आज पुन्हा एकदा 11 पैशांनी वाढलं आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. तर आठ जिल्हे असे आहेत, जिथे पेट्रोल जवळपास नव्वद रुपये प्रति लिटर आहे.
डिझेलच्या दरात आज कोणतीही वाढ झालेली नाही. पण पेट्रोलने मात्र दरवाढीचे सर्व विक्रम मोडित काढण्याची आपली मालिका कायम ठेवलेली आहे. आयओसीएलच्या वेबसाईटनुसार, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल सर्वाधिक महाग आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये पेट्रोल 92.55 रुपये प्रति लिटर आहे. तर धर्माबादपासून अवघ्या पाच किमीवर असलेल्या तेलंगणाच्या सीमेपलिकडे पेट्रोल चार रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळे पेट्रोलसाठी आता सीमा ओलांडण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक महाग पेट्रोल
देशातलं सर्वाधिक महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळतं. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर 39 टक्के (+कर) वॅट वसूल केला जातो. यामध्ये विविध प्रकारच्या करांचा समावेश आहे.
दुष्काळी कर तीन रुपये, महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन तीन रुपये, शिक्षण कर एक रुपया, स्वच्छ भारत अभियानचा एक रुपया, कृषी कल्याण अभियान एक रुपया असा एकूण नऊ रुपये कर आकारला जातोय.
सुप्रीम कोर्टाने महामार्गांलगतच्या दारु विक्रीवर बंदी आणली होती. त्यानंतर राज्य सरकारने महसुलात घट झाल्याचं कारण देत पेट्रोल आणि डिझेलवर तब्बल तीन रुपये कर आकारणी सुरु केली. काही काळाने दारु विक्रीही सुरु झाली, पण कर कायम आहे. तर 2014-15 सालच्या दुष्काळात आकारलेला तीन रुपये करही अजून कमी केलेला नाही.
जिल्हा पेट्रोल दर डिझेल दर (प्रति लिटर)
अहमदनगर 89.67 77.11
अकोला 89.81 77.26
अमरावती 91.05 79.71
औरंगाबाद 90.85 79.48
बीड 90.80 77.95
भंडारा 90.58 78.00
बुलडाणा 90.23 77.67
चंद्रपूर 89.77 77.24
धुळे 89.73 77.17
गडचिरोली 90.52 77.96
गोंदिया 90.86 78.27
हिंगोली 90.57 78.00
जळगाव 90.75 78.14
जालना 90.62 78.01
कोल्हापूर 89.96 77.40
लातूर 90.50 77.92
नागपूर 90.28 78.95
नांदेड 91.37 78.76
नंदुरबार 90.64 78.05
नाशिक 90.16 77.57
उस्मानाबाद 90.19 77.62
परभणी 91.58 78.94
पुणे 89.87 77.29
रायगड 89.82 77.22
रत्नागिरी 90.81 78.22
सांगली 89.70 77.15
सातारा 90.28 77.68
सिंधुदुर्ग 90.69 78.11
सोलापूर 90.85 79.04
ठाणे 89.88 78.51
वर्धा 89.99 77.43
वाशिम 90.28 77.72
यवतमाळ 90.82 78.23
पालघर 89.66 77.06
मुंबई उपनगर 89.87 78.49
मुंबई शहर 89.80 78.42
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement