एक्स्प्लोर
इंधन दरवाढ सुरुच, नांदेडच्या धर्माबादमध्ये पेट्रोल 92 रुपयांवर
नांदेडमधील धर्माबाद तालुक्यात पेट्रोल 92.19 रुपयांवर पोहचलं आहे, तर परभणीत तब्बल 91.22 रुपये लिटरने पेट्रोलची विक्री होत आहे.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे भाव रोज नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहेत. परभणी-नांदेडमध्ये पेट्रोलच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. नांदेडमधील धर्माबाद तालुक्यात पेट्रोल 92.19 रुपयांवर पोहचलं आहे, तर परभणीत तब्बल 91.22 रुपये लिटरने पेट्रोलची विक्री होत आहे.
पेट्रोलच्या किमतीत आज 15 पैशांनी तर डिझेलच्या किमतीत 7 पैशांनी वाढ झाली. मुंबईत पेट्रोल 89.44 रुपये लिटरने विकलं जात आहे, तर डिझेल 78.33 रुपयांवर पोहचलं आहे.
पुढचे काही दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर असेच वाढत राहिले तर काही दिवसताच पेटोल शंभरी गाठणार आहे. इंधन दरांवर नियंत्रण नसल्याचं सांगत सरकारने हात वर केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांच्या खिशाला रोज झळ बसत आहे.
गेल्या 16 दिवसात पेट्रोल सातत्याने महागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोलचे दर 86.09 रुपये प्रति लिटर इतके होते. आज हाच दर 89.44 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसात पेट्रोलच्या दरात 3 रुपये 35 पैशांची वाढ झाली आहे.
मुंबई पेट्रोल- 89.44 रुपये डिझेल- 78.33 रुपये
नांदेड शहर पेट्रोल 91.00, डिझेल 78.65 धर्माबाद तालुका, जिल्हा नांदेड पेट्रोल 92.19, डिझेल 82.89 उमरी तालुका, जिल्हा नांदेड पेट्रोल 91.89, डिझेल 79.49
संबंधित बातम्या पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर! इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतचअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement