पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्यानं पतीची दोन चिमुकल्यांना संपवून आत्महत्या
गेल्या काही दिवसांपासून ऋषीकांत यांचे त्यांच्या पत्नीसोबत काही वाद सुरु होते, अशी माहिती समोर येत आहे.
चंद्रपूर : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या कारणातून पतीने आपल्या दोन चिमुकल्यांची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूरमधील बल्लारपूर शहरात ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ऋषीकांत कडुपाले असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे. ऋषिकांत हे आयटीआय कॉलेजमध्ये शिक्षक होते तर चंद्रपुरातील कन्नमवार वार्ड परिसरात राहत होते, अशी माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋषीकांत यांचे त्यांच्या पत्नीसोबत काही वाद सुरु होते.
या वादानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. या घटनेचा ऋषीकांत यांना जबर धक्का बसला. त्यानंतर काल त्यांनी आपली 5 वर्षाची मुलगी नारायणी आणि 2 वर्षाची मुलगी कार्तिकीची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी ऋषीकांत यांच्या पत्नीचा तपास सुरु केला आहे.
व्हिडीओ - टॉप 25 न्यूज बुलेटिन | 2 एप्रिल 2019 | एबीपी माझा