Rishikesh Sathawane : समलैंगिकता ही शहरी उच्चभ्रू संकल्पना नाही, भारतातील पहिले समलैंगिक विवाहित ऋषिकेश साठवणे यांचं मत!
भारतामध्ये अजूनही समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे ऋषिकेश यांच्या विवाहाला भारतात मान्यता नाही. मात्र, अमेरिकेत समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाली आहे.
Rishikesh Sathawane Talk on Same Sex Marriage: भारतामध्ये अजूनही समलैंगिक विवाहाला (same-sex marriage in India) कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे समलैंगिक ऋषिकेश साठवणे (Rishikesh Sathawane) यांच्या विवाहाला भारतात मान्यता नाही. मात्र, अमेरिकेत समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाली आहे. त्यांनी 'द वायर'वर लिहिलेल्या पत्रात समलैंगितेबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणतात की, समलैंगिकता ही शहरी उच्चभ्रू संकल्पना नाही. समाजातील नैतिकता ही आधीपासून सतत बदलत आली आहे. एबीपी माझाच्या 'मधली ओळ'च्या मुलाखतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी यवतमाळपासून आयआयटी मुंबई ते अमेरिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा राहिला? हे सर्व अनुभव त्यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये मनमोकळेपणाने व्यक्त केले आहेत.
समलैंगिक विवाहाविषयी ऋषिकेश यांचं काय मत आहे?
भारतामध्ये अजूनही समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे ऋषिकेश यांच्या विवाहाला भारतात मान्यता नाही. मात्र, अमेरिकेत समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाली आहे. त्यांनी 'द वायर'वर लिहिलेल्या पत्रात केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणतात की, "समलैंगिकता ही शहरी उच्चभ्रू संकल्पना नाही. समाजातील नैतिकता ही आधीपासून सतत बदलत आली आहे. यापूर्वी आंतरजातीय विवाह चांगले नसतात, असं म्हटलं जात होतं. पण आता त्याला इतका विरोध केला जात नाही. त्यामुळे आजच्या काळात अमूक-अमूक गोष्ट नैतिक आहे, असं म्हणू शकत नाही. पुढे ते असं म्हणतात की, समलैंगिक विवाहाला मान्यता दिली तर कुणाला ना कुणाला समस्याजनक वाटू शकतं. ही समस्या दूर करण्यासाठी समलैंगिकबद्दलची नीट माहिती घेणं आणि भीती दूर करण्यासाठी समलैंगिक व्यक्तींनी संवाद साधला पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर कळेल की तेही सर्वसामान्य माणसासारख्या भावना असणारी माणसं आहेत.
भारतीय आणि अमेरिकन समाजातील वेगळेपणाबद्दल ते सांगतात की, "भारतात समलैंगिकतेचा कायदा सर्वप्रथम ब्रिटिशांनी आणला होता तेव्हा हा कायदा अनाधिकृत नव्हता. पण आता अनाधिकृत का करण्यात आला आहे? हे काही कळत नाही." ते पुढे म्हणतात की, पाश्चात्यांनी केलं म्हणून तोच बदल इकडेही व्हायल हवा, असं काही नाही. कोणतीही गोष्ट तुमच्या समाजाला अनुकूल करुनच घ्यावी लागते. ते पुढे केंद्र सरकारच्या सध्याच्या भूमिकेवर असं म्हणतात की, भाजप सरकार बऱ्याच चांगल्या गोष्टी करत आहे. फक्त यावर उलट-सुलट चर्चा घडवून येऊ नये म्हणून केंद्र सरकार समलैंगिकच्या विषयावर स्पष्ट बोलत नाही. सध्या भारतात गरिबी, असमानता हे खरे प्रश्न आहेत. याकडे सरकारने अधिक लक्ष द्यायला हवं."
समलैंगिक विवाहीत ऋषिकेश साठवणे कोण आहेत?
ऋषिकेश साठवणे हे भारतातील पहिले समलैंगिक विवाहित आहेत. ऋषिकेश हे मूळचे यवतमाळचे आहेत. इथेच त्यांचं बालपण गेलं. त्यांना आधीपासूनच स्वत:च्या शारीरिक वेगळेपणाची भावना जाणवत होत्या. त्यांना लहानापासूनच मुलींबद्दल कधीही आकर्षण नव्हतं. त्याकाळी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसतानाही हे सर्व भावना मनात दबून राहिल्याचं ऋषिकेश यांचं म्हणणं आहे. जेव्हा त्यांनी यवतमाळवरुन आयआयटी मुंबईमध्ये इंजिनिअरिंगच शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला तेव्हा आपण समलैंगिक असल्याचं मत ऋषिकेश यांचं बनलं होतं. पुढे अमेरिकेत नोकरीसाठी गेल्यानंतर तेथील एलजीबीटी ग्रुपशी त्यांचा संबंध आला आणि त्यांना समलैंगिकतेबद्दल अधिक आत्मविश्वाने बोलण्याचं धाडस मिळालं. पण जी आतली जाणीव आहे ती आधीपासूनच होती.
ऋषिकेश मूळचे यवतमाळचे असले तरी सध्या अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांच पाच एक वर्षापूर्वी यवतमाळच्या अलिशान हॉटेलमध्ये भारतातील पहिला समलैंगिक विवाह पार पडला होता. त्यांच एका व्हिएतनामी मित्रावर प्रेम जडलं होतं. त्यांच्यासारखच अमेरिकत स्थायिक झाला होता. त्याच्यावर ऋषिकेश यांचा जीव जडला आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समलैंगिक पार्टनरचं नाव 'व्हीन' असं आहे. याआधी त्यांच्या पालकांकडून मुलींची अनेक स्थळे आणली होती. या सर्व स्थळांना स्पष्ट नकार दिला. यादरम्यान त्यांना कुटुंबियांकडून अनेक अडचणींना तोंड द्यावा लागलं. हा संघर्ष तब्बल 7 वर्ष सुरु राहिला. यावरुन आईने सारखं प्रश्नांचा भडिमार केला. पण या प्रवासात बहिणीने खूप पाठिंबा दिला. अखेर डिसेंबर 2017 साली त्यांचं समलैंगिक लग्न पार पडलं होतं. यासाठी ऋषिकेश यांच्या उच्च शिक्षणाचा खूप मोठा वाटा राहिला आहे.
दरम्यान बुधावारी सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या युक्तिवादादरम्यान समलैंगिक विवाह ही संकल्पना शहरी किंवा तत्सम असल्याचे दर्शवणारी कोणतीही माहिती केंद्र सरकारकडे नाही, असं धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी नमूद केलं आहे. समलैंगिक विवाहाला कायद्याने मान्यता मिळावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठासमोर बुधवारीही सुरु राहिली. केंद्र सरकारने आधी दाखल केलेल्या अर्जामध्ये समलैंगिक विवाह ही शहरी उच्चभ्रू संकल्पना असल्याचा दावा केला आहे.