एक्स्प्लोर

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार प्रवाशांची सुरक्षा, मध्य रेल्वेवर आजपासून दोन नवीन उपक्रम सुरू

महिलांसाठी सुरु करण्या आलेला ऑनलाइन स्मार्ट सहेली उपक्रम प्रवासी महिलांच्या सहभागातून पुढे नेण्यात येणार आहे. यामध्ये अभिनव कल्पना राबवून व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहेत.

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आज दोन नवीन उपक्रम सुरू केले आहेत. लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी रेल्वे सुरक्षा दलाचा ऑनलाइन स्मार्ट सहेली हा उपक्रम सुरू करण्यात आला. तर संपूर्ण मध्य रेल्वेवरील सतरा स्थानकांवर अतिशय अद्ययावत अशी व्हिडिओ सर्वेलांस सिस्टिम बसवण्यात आली याचे उद्घाटन आज करण्यात आले. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या दोन्ही उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.

महिलांसाठी सुरु करण्या आलेला ऑनलाइन स्मार्ट सहेली उपक्रम प्रवासी महिलांच्या सहभागातून पुढे नेण्यात येणार आहे. यामध्ये अभिनव कल्पना राबवून व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहेत. त्यातील प्रत्येक व्हाट्सअप ग्रुप मध्ये एखाद्या लोकलमधून नियमित प्रवास करणाऱ्या चार महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. सोबत या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आर पी एफ चा महिला अधिकारी आणि मध्य रेल्वेचे अधिकारी देखील समाविष्ट असतील. यातून काही महिलांना विशिष्ट जबाबदारी देण्यात येईल. त्याद्वारे धावत्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांवर अत्याचार, अन्याय किंवा महिला डब्यांमध्ये एखादा गुन्हा घडत असेल तर त्याची माहिती इथे आरपीएफ ला कळेल. आणि तो गुन्हा घडायच्या आधीच आरपीएफ महिला डब्यात पोहोचलेली असेल. यामध्ये आरपीएफ महिला प्रवाशांसोबत जीआरपीची देखील मदत घेणार आहे.

तर दुसऱ्या उपक्रमातून अद्यावत तंत्रज्ञान वापरून स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा अबाधित राखली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या सतरा वेगवेगळा स्थानकांवर बसवलेल्या आयपी बेस्ड व्हिडिओ सर्वेलांस सिस्टिम' रेल टेल द्वारे बसवण्यात आले आहे. ही एक अद्ययावत यंत्रणा असून रेल्वेस्थानकांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी आणि उघडकीस आणण्यासाठी या यंत्रणेचा खूप फायदा होणार आहे. यंत्रणेत स्थानकांच्या विविध ठिकाणी हाय डेफिनेशन असलेले अद्ययावत कॅमेरे बसवले जातात. त्यातून रेकॉर्ड होणारे सर्व व्हिडीओ हे एका मध्यवर्ती नियंत्रण कक्षात बसून आरपीएफ द्वारा पाहिले जातात. त्यामुळे गुन्हे घडण्याच्या आधीच ते रोखता येणे शक्य होते. त्याचप्रमाणे या सिस्टीम मध्ये फेस डिटेक्शन म्हणजेच एखादा हवा असलेला आरोपी किंवा हरवलेला व्यक्ती शोधण्यासाठी देखील सॉफ्टवेअर असते. त्यामुळे या यंत्रणेचा मोठा फायदा रेल्वे प्रशासनाला होतो. संपूर्ण महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या विविध 17 स्थानकांवर आजपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Eknath Shinde OBC : जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी निकटवर्ती बड्या नेत्याला ओबीसींच्या महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी निकटवर्ती बड्या नेत्याला ओबीसींच्या महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Embed widget