एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बदनामीची सुपारी घेणाऱ्यांना चोख उत्तर : पंकजा मुंडे
बीड: चिक्की घोटाळ्याप्रकरणी एसीबीने क्लीनचिट दिल्यानंतर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे.
माझी बदनामी करून, राजीनामा मागण्याची सुपारी घेणाऱ्यांनी कितीही कागद नाचवले, तरी त्यात काही तथ्य नाही हे आज सिद्ध झाले आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
"मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेतले नाहीत. टेंडरिंग रेट, कॉन्ट्रॅक्ट अस्तित्वात असताना निविदा काढल्या. सुप्रीम कोर्टानेदेखील आमची निविदा योग्य असल्याचे सांगितले होते. मात्र माझ्या राजीनाम्यासाठी कागदी घोडे नाचवणाऱ्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं उघड झालं आहे", असं पंकजा मुंडेंनी नमूद केलं.
ज्या चिक्कीचे वाटपच झाले नाही, त्या चिक्कीवरुन माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले.चिक्की तपासणीचे रिपोर्ट देशातल्या वेगवेगळ्या पंधरा ठिकाणी पाठवण्यात आले, त्यावेळी देखील तो रिपोर्ट चांगला आल्याचं पंकजा म्हणाल्या.
विरोधी पक्षनेत्यानेही आमच्या विरुद्ध तक्रार केली होती. मात्र आज लाचलुचपत प्रतिबंध विभागाला यात काहीच आढळून आलं नाही. मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेतले नाहीत, असा दावा पंकजा मुंडेंनी केला.
पंकजा मुंडेंना क्लीन चिट
चिक्की घोटाळ्याप्रकरणी महिला कल्याण आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना क्लीनचिट मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यासंदर्भातील फाईलही बंद केली आहे. तसा अहवालनच गृहविभागाला पाठवण्यात आला आहे.
पंकजा मुंडेंनी अधिकारांचा वापर करुन अंगणवाडीसाठीच्या वस्तूंसाठी नियम धाब्यावर बसवले. एकाच दिवशी अनेक जीआर काढून 206 कोटींच्या वस्तूंसाठी 24 कंत्राटं दिली, असा आरोप पंकजा मुंडेंवर होता. मात्र, एका दिवसात किती कंत्राटं द्यायची याचा पूर्ण अधिकार संबंधित मंत्री आणि खात्याचा असल्याचं स्पष्टीकरण एसीबीने दिलं आहे.
संबंधित बातम्या
चिक्की घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडेंना क्लीनचिट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement