एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांसोबतच्या वादानंतर पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट
मुंबई : राज्य सरकारच्या खातेवाटपात जलसंधारण खातं काढून घेतल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र वर्ल्ड वॉटर लीटर समिटच्या परिषद आणि खातेबदला संदर्भात पंकजा मुंडेंनी फेसबुकवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
पंकजा मुडेंनी फेसुबकवर लिहिलं आहे की,
"मी नम्र विनंती करते, कोणीही माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी मला न पटणा-या गोष्टी करू नये. कोणत्याही व्यक्तीचा अवमान होईल असे कृत्य करू नये. कायदा व सुव्यवस्था राखावी. मी इंडोनेशिया हून आज सिंगापूरला पोहोचले. देशाबाहेर असल्याने मी tweet केले . इथे वर्ल्ड वाॅटर लिडर समिट साठी मला निमंत्रित केले होते. नुकत्याच झालेल्या खाते बदलानंतर आपण जलसंधारण मंत्री नसताना जाणे मला जरा अयोग्य वाटले. माझ्या जिल्ह्यातील लोकं तसेच पञकार माझ्या बातम्या, फोटो अपेक्षित ठेवतील म्हणून न जाण्याचा निर्णय मी twitter वरून जाहीर केला. मला सिंगापूरकडुन निमंत्रण होते म्हणून मी आले होते.
सर्वच नविन मंत्री अभिनंदनास पात्र आहेत. माझे निकटवर्तीय राम शिंदे व जयकुमार रावल यांना माझ्याकडील खाती दिली गेली, याचा मला आनंद आहे. त्या दोघांचे मी ट्विटरवरून अभिनंदन देखील केले. जलयुक्त शिवार आता Peak वर आहे व ते Mission म्हणून व Passion म्हणूनही ते स्विकारतील असे विश्वास दाखवणारे स्टेटमेंट केले ..त्याना संधी मिळाली तर सहकारी म्हणून अभिमानच वाटला पाहिजे. नाराजीचा विषयच कुठे??
त्या दोघांना शुभेच्छा!!! त्यांचं मनोबल वाढेल असचं सहकार्य त्यांना झालं पाहिजे आणि मी ते करणारच....."
पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेबदल
खरंतर मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेकडील जलसंधारण आणि रोजगार हमी योजना ही दोन महत्त्वाची खाती काढून घेण्यात आली. सध्या त्यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला बालकल्याण या खात्यांची जबाबदारी आहे. कॅबिनेटपदी प्रमोशन झालेल्या राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जयकुमार रावल यांच्याकडे रोजगार हमी योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे.
पंकजांचं ट्वीट आणि मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय
तत्पूर्वी सिंगापूरला वर्ल्ड वॉटर लीडर समिटसाठी पोहोचलेल्या पंकजा मुंडेंनी आता मी जलसंधारण खात्याची मंत्री नसल्याने या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं ट्वीट केलं होतं. त्यावर खात्याची मंत्री म्हणून नव्हे तर सरकारची प्रतिनिधी म्हणून या परिषदेला हजर राहा, असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजांना आदेश दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement