एक्स्प्लोर
Advertisement
म्हणून राजकारण सोडायची इच्छा होते, पंकजा मुंडेंची उद्विग्नता
मुंबई : सातत्यानं होणाऱ्या आरोपांमुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उद्विग्न झाल्या आहेत. भ्रष्टाचाराबद्दल बिनबुडाचे होणारे आरोप ऐकून कधी कधी राजकारण सोडायची इच्छा होते, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
पंकजा मुंडेंचं रस्ते घोटाळ्यात नाव आल्यानंतर आज विधानसभेत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारला. जून 2012 मध्ये पंकजा यांच्या सुप्रा मीडिया कंपनीसोबत आरपीएस कंपनीनं भागीदार केलं.
मुंबईतील रस्ते घोटाळ्याचे धागेदोरे पंकजा मुंडेंपर्यंत
मुंडेंच्या कंपनीशी भागीदारी केल्यानंतर या आरपीएस कंपनीला तब्बल 1398 कोटीच्या कामांची कंत्राटं मिळाली, असा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी आरोपाचं खंडन करत पंकजा मुंडेंची पाठराखण केली आहे. यापूर्वी चिक्की घोटाळा आणि सेल्फी प्रकरणामुळेही पंकजा मुंडेंवर टीकेची झोड उठली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement