एक्स्प्लोर
पंकजा मुंडेंच्या पालघर दौऱ्यापूर्वी लागू केलेली जमावबंदी मागे
पालघर : महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या मोखाडा दौऱ्याआधी लागू करण्यात आलेली जमावबंदी रद्द करण्यात आली आहे. पंकजा मुंडेंच्या विनंतीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी रद्द करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे आज पालघर जिल्ह्यातल्या कुपोषणग्रस्त कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडेंनी या जमावबंदीला विरोध केला.
मी पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे जमावबंदी लाऊ नये अशी विनंती मुंडेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्यानंतर ही जमावबंदी मागे घेण्यात आली आहे.
मोखाड्यातल्या सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाला. इतकंच नाही तर कुपोषण आणि इतर कारणांमुळे पालघर जिल्ह्यात 600 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या आठवड्यात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी गेले होते. मात्र मृत बालकाच्या आईने सावरा यांना दारातून परतून लावलं. पंकजा मुंडे या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत.
संबंधित बातम्या :
पंकजा मुंडेंच्या पालघर दौऱ्याआधी जमावबंदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement