(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना दोन वर्षापूर्वीच दिली होती MIM मध्ये येण्याची 'ऑफर'; असदुद्दीन ओवैसींचा मोठा दावा
Maharashtra Politics : पंकजा मुंडे यांना दोन वर्षापूर्वीच MIM मध्ये येण्याची ऑफर आम्ही दिली होती असा दावा एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी केला आहे.
Maharashtra Politics : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांच्याकडून आपल्या बीआरएस (BRS) पक्षाला देशभरात वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असून, याची सुरवात त्यांनी महाराष्ट्रातून केली आहे. दरम्यान यासाठी त्यांनी राज्यातील महत्वाच्या पक्षातील मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहे. दरम्यान याचवेळी बीआरएस पक्षाने भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. दरम्यान या ऑफरची चर्चा सुरु असतानाच, पंकजा मुंडे यांना दोन वर्षापूर्वीच MIM मध्ये येण्याची ऑफर आम्ही दिली होती असा दावा एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी केला आहे.
असदुद्दीन ओवैसी हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. दरम्यान यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तर पंकजा मुंडे यांना बीआरएस पक्षाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असल्याचा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. ज्याला उत्तर देतांना ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांना दोन वर्षांपूर्वीच जलील यांनी एमआयएममध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण त्यांना समजत नाही. पंकजा यांनी याचा विचार करायला पाहिजे. तर इम्तियाज जलील यांनी त्यांची भेट सुद्धा देखील घेतली होती. त्यामुळे त्यांनी विचार करावा. तसेच प्रत्येकजण आपला पक्ष वाढवू शकतात आणि हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे, असे ओवेसी म्हणाले.
बीआरएसकडून पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर...
गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून पंकजा मुंडे यांची कोंडी केली जात असल्याची सतत चर्चा आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर बीआरएस पक्षाकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून ऑफर देण्यात आली आहे. याबाबत बोलताना बीआरएस पक्षाचे नेते शिवराज बांगर म्हणाले की, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. तर त्या मास्क लीडर असून, लोकनेत्या आहेत. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये कोंडी केली जात आहे. त्यांना संपवण्याचा काम भाजपकडून करण्यात येत आहे. देशात ममता बनर्जी, वसुन्धरा राजे सिंधिया यांच्यानंतर एक ताकदीची नेत्या म्हणजे पंकजा मुंडे या आहेत. राज्यातील किमान 50 विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा प्रभाव आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या बीआरएस पक्षात आल्यास त्या जागेवर आम्हाला फायदा होईल. तसेच मुख्यमंत्री पदाची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी बीआरएस पक्षात यावे अशी त्यांना माची विनंती असणार असल्याचे बीआरएस पक्षाचे नेते शिवराज बांगर म्हणाले .
इतर महत्वाच्या बातम्या: