एक्स्प्लोर
खुर्ची टिकवण्यासाठीचे निर्णय घेणं बंद करा : पंकजा मुंडे
अंगणावाडी सेविकांना मेस्मातून वगळ्यानं पंकजा नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच, काही दिवसांपूर्वीची त्यांची फेसबुक पोस्टही चांगलीच चर्चेत आली होती.

औरंगाबद : राज्यकर्त्यांनी खुर्ची टिकण्यासाठी निर्णय घेणं बंद केल्यास जनतेचं भलं होईल, अशा शब्दात महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी स्वकीयांचे कान टोचले आहेत. औरंगाबादमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या? “महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी मी एक आमदार आहे. मंत्रिमंडळातील पहिल्या पाच मंत्र्यात माझा समावेश आहे, असे असताना महिलांच्या अस्मितेसाठी, आरोग्यासाठी काही केले नाही. तर माझ्या मंत्रीपदाला काहीही अर्थ राहणार नाही. खुर्चीला जपण्याचे निर्णय घेणे राज्यकर्ते जेव्हा बंद करतील त्या दिवशी जनतेचे जीवन उंचावलेले असेल. त्यासाठी निर्णय घेण्याची तयारी असायला हवी.”, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. सरकारमधील निर्णयात पंकजा मुंडेंना सातत्यानं डावललं जात असल्याची चर्चा आहे. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यासाठी आग्रही असणाऱ्या पंकजा मुंडेंना डावलून राज्य सरकारनं निर्णय बदलला. अंगणावाडी सेविकांना मेस्मातून वगळ्यानं पंकजा नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच, काही दिवसांपूर्वीची त्यांची फेसबुक पोस्टही चांगलीच चर्चेत आली होती. VIDEO :
आणखी वाचा























