एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बीडच्या 'त्या' 6 झेडपी सदस्यांना पंकजा मुंडेंकडून दिलासा

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या सदस्यांचं पद रद्द करण्याचा आदेश दिला होता.

बीड : पक्षादेश डावलल्याचा ठपका ठेवत अपात्र ठरवलेल्या बीडच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलासा दिला आहे. पक्षादेश डावलून भाजपला साथ देणाऱ्या या सहा जिल्हा परिषद सदस्यांचं पद रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. शिवाजी पवार (पाडळी), अ‍ॅड. प्रकाश कवठेकर (डोंगरकिन्ही), अश्विनी जरांगे (अंमळनेर), संगीता महानोर (दौलावडगाव), अश्विनी निंबाळकर (हरि नारायण आष्टा) सर्व धस समर्थक आणि मंगल डोईफोडे (पिंपळनेर) आ. क्षीरसागर समर्थक या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाली होती. काय आहे प्रकरण? जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीदरम्यान राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या धस समर्थक पाच सदस्यांनी पक्षादेश डावलून भाजपला मतदान केलं होतं. तर क्षीरसागर गटाच्या मंगल डोईफोडे आजारी असल्याचं सांगून मतदानाला गैरहजर राहिल्या होत्या. सर्वाधिक सदस्य निवडून येऊनही राष्ट्रवादीला जि.प. मधील सत्ता गमवावी लागली होती. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकेड आक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्याकडे सुनावणी झाली. 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी सिंह यांनी पक्षादेश डावलल्याप्रकरणी सहाही सदस्यांना अपात्र ठरवलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती अपात्र ठरलेल्या सहाही सदस्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे धाव घेतली होती. पंकजा यांच्याच ताब्यात जि.प. असल्याने त्यांनी भाजपला थेट सहकार्य करणाऱ्या पाच आणि क्षीरसागर समर्थक एका सदस्याला दिलासा देत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अंतरित स्थगिती दिली. ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव आर. एम. गेंगजे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना याबाबत कळवलं आहे. बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल – एकूण जागा- 60
  • राष्ट्रवादी- 25
  • भाजपा- 19
  • काँग्रेस- 03
  • शिवसंग्राम- 04
  • शिवसेना- 04
  • काकू-नाना आघाडी- 03
  • गोपीनाथ मुंडे आघाडी- 01 (भाजपा पुरस्कृत)
  • अपक्ष- 01 ( राष्ट्रवादी पुरस्कृत)

संबंधित बातमी :  बीडमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या झेडपी सदस्यांचं पद रद्द

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Embed widget