एक्स्प्लोर
नशिब पालटणाऱ्या ट्रॅक्टरला 'त्या'ने बंगल्यावर दिलं स्थान!
ज्या पहिल्या जुन्या ट्रॅक्टरने नशीब बदललं, त्या ट्रॅक्टरची आठवण कायम ठेवण्याची भूमिका सोमनाथ आणि त्याच्या कुटुंबाची होती.

पंढरपूर : आपल्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या व्यक्तीची किंवा वस्तूची प्रत्येकाला जाण असतेच, असं नाही. मात्र पंढरपुरातील एका तरुणाने त्याचं नशीब पालटवणाऱ्या ट्रॅक्टरचे ऋण अनोख्या पद्धतीने व्यक्त केले आहेत. आपल्या बंगल्याच्या गच्चीवरच त्याने ट्रॅक्टरची स्थापना केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील गादेगावमध्ये राहणाऱ्या सोमनाथ बागलची परिस्थिती खूपच हलाखीची होती. इतरांच्या शेतावर मजुरीला जाणाऱ्या सोमनाथला वडिलांनी जुना ट्रॅक्टर घेऊन दिला. या ट्रॅक्टरच्या मदतीने त्याने मेहनत करायला सुरुवात केली.
हळूहळू परिस्थिती बदलू लागली, एकाचे दोन, दोनाचे चार ट्रॅक्टर झाले. सोबतच नवीन जेसीबी आला. मात्र ज्या पहिल्या जुन्या ट्रॅक्टरने नशीब बदललं, त्या ट्रॅक्टरची आठवण कायम ठेवण्याची भूमिका सोमनाथ आणि त्याच्या कुटुंबाची होती.
प्रामाणिक कष्ट आणि व्यवसायातून पैसे मिळू लागले आणि यातूनच शेतात तीनमजली भव्य बंगल्याचं काम सुरु झालं. मात्र घराचं काम सुरु करताना पहिल्यांदा आपल्या लक्ष्मीसाठी सोमनाथने जागा निश्चित केली.
बांधकामात तीन लाख रुपये जादा खर्च करत टेरेसवर त्याने हा खराखुरा ट्रॅक्टर बसवला. दोन क्रेनच्या मदतीने हा ट्रॅक्टर चढवण्यात आला. अद्यापही घराचं काम सुरु असलं, तरी या घरात पहिली जागा त्याने ट्रॅक्टरला दिली.
परिसरातील मंडळी सोमनाथची ओळख 'ट्रॅक्टरचं घर' म्हणून ठेवत असून अनेकजण हे पाहायला गादेगावमध्ये येत असतात. सोमनाथचं हे ट्रॅक्टरप्रेम ऐकून थेट महिंद्रा कंपनीचे अधिकारीही त्याचा सत्कार करुन गेले. सोमनाथ आजही सकाळी आधी आपल्या लक्ष्मीचं दर्शन घेतो आणि मगच शेतीतली कामं उरकून ट्रॅक्टरच्या व्यवसायाला बाहेर पडतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
