एक्स्प्लोर
पत्नीसह मुलीची डोक्यात रॉड घालून हत्या, पतीला अटक

पंढरपूर : पत्नीसह पाच वर्षांच्या मुलीची एका इसमाने डोक्यात रॉड घालून निर्घृण हत्या केली आहे. पंढरपुरातल्या रोपळेमध्ये ही घटना घडल्याचं उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी प्रशांत वट्टमवारला पोलिसांनी अटक केली आहे. पंढरपुरातल्या रोपळे गावात टेलरिंग आणि मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या प्रशांतचं पहाटेच्या सुमारास पत्नीशी भांडण झालं. घरगुती कारणावरुन सुरु झालेल्या या वादातून प्रशांतचा संताप एवढा टोकाला पोहचला की त्यानं पत्नीवर थेट रॉडनं हल्ला केला. त्यानंतर त्यानं चिमुरड्या ज्ञानेश्वरीवरही रॉडनं वार केला. यात त्या दोघींचाही मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर प्रशांत स्वतः पोलिसांना शरण गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
निवडणूक























