एक्स्प्लोर
चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू

पंढरपूर : चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. ही चारही मुलं चंद्रभागा घाटाजवळ पोहण्यासाठी गेली होती. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले पाण्यात बुडाली. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी चारही मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. सौरव शहापुरकर , दिपू शहापुरकर , गणेश धुमाळे आणि धीरज धुमाळे अशी या चार मुलांची नावं आहेत. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात या चारही मुलांना आणल्यानंतर डॉक्टरांनी व्यवस्थीत उपचार केले नसल्याचा, आरोप नातेवाईकांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
आरोग्य
निवडणूक
व्यापार-उद्योग























