एक्स्प्लोर
विठ्ठलाच्या दानपेटीतील 1 कोटी 22 लाख बँकेत जमा
सोलापूर: राज्यातील देवस्थानांना दानपेटीतील रक्कम तात्काळ बँकांमध्ये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर पंढरपुरात विठूरायाच्या दानपेटीतील रक्कम बँकेत जमा करण्यात आली.
विठूरायाच्या दानपेटीतून 1 कोटी 22 लाख रुपये सुट्टे पैसे बँकेत जमा करण्यात आले आहेत.
कार्तिकीनंतर जमा झालेल्या देणगीची अजूनही मोजदाद सुरुच आहे. हजार आणि पाचशेच्या नोटा वगळून सुट्टे पैसे बँकेत जमा करण्यात आलेत.
दरम्यान, राज्यातील सर्व देवस्थानं आणि धर्मदाय संस्थांना मिळणारी देणगी त्याच दिवशी बँकांमध्ये भरण्याचे आदेश देण्यात आलेत.
केंद्र सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार राज्याच्या विधी आणि न्याय विभागानं तसं परिपत्रक काढलं आहे. देवस्थानांमार्फत काळा पैसा पांढरा होण्याची भीती सरकारला होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
संबंधित बातम्या
''देवस्थानांनी देणग्या नियमित बँकात जमा कराव्या''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement