एक्स्प्लोर
Advertisement
विश्वजीत कदमांविरोधात भाजपकडून पृथ्वीराज देशमुखांना उमेदवारी
माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभच्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
सांगली : माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभच्या पोटनिवडणूक जाहीर झाली असून काँग्रेसच्या वतीनं पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपनेही पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पृथ्वीराज देशमुख 10 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे आता विश्वजीत कदम यांच्यासमोर देशमुखांचं आव्हान असणार आहे.
दरम्यान, विश्वजीत कदम यांनी आज आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. यावेळी सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते अर्ज भरण्यासाठी जमा झाले होते. पतंगराव कदम यांना मानणारा मोठा वर्ग सांगली जिल्ह्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नेतेही याप्रसंगी उपस्थिती होते.
या पोटनिवडणुकिसाठी राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. भाजपने देखील ही निवडणूक बिनविरोध करावी अशी भावनिक साद काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांनी घातली होती. मात्र, भाजप ही पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहे.. एखाद्या ज्येष्ठ नेत्यांचे निधन झाले की तेथील निवडणूक बिनविरोध केली जाते. पण भाजपने काँग्रेस विरोधात ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पृथ्वीराज देशमुख हे पतंगराव कदमांचे कट्टर प्रतिस्पर्धक म्हणून ओळखले जात होते. पलूस-कडेगाव मतदारसंघात या दोन नेत्यामध्ये कडवा राजकीय सत्तासंघर्ष पाहायला मिळाला होता. असे असले तरी येथील कदम-देशमुख घराण्यातील नेत्यांनी विधायक दृष्टिकोनातून विकास कामांसाठी मात्र समन्वय देखील कायम ठेवला होता.
कडेगाव-पलूस मतदारसंघात पतंगराव कदम यांनी एकंदरीत सहा निवडणुका जिंकल्या होत्या. तर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत संपतराव देशमुख यांनी पतंगराव कदम यांना पराभूत केले होते. तर संपतराव देशमुख यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत त्याचे पुतणे असलेले पृथ्वीराज देशमुख यांनी पतंगराव कदम यांना पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
कोण आहेत पृथ्वीराज देशमुख
- भाजपचे सांगली जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष
- संपतराव देशमुख यांचे पुतणे
- १९९६-९९साली युती सरकारमध्ये अपक्ष आमदार (पलूस-कडेगाव मतदारसंघ)
- २००० साली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
- पतंगराव कदम यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी
- २०१४ मध्ये NCP ला सोडचिठी देत भाजपमध्ये प्रवेश
- भाजप सांगली जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून निवड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement