एक्स्प्लोर

पालघर भूकंप : एनडीआरएफची दोन पथकं पोहोचली, नागरिकांमध्ये जनजागृती करणार

भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना भूकंपानंतरच्या परिस्थितीला कसं सामोरं जावं याचं प्रात्यक्षिक एनडीआरएफकडून देण्यात येणार आहे. एनडीआरएफने सोबत 200 टेंट आणि आपत्ती व्यवस्थापनाची सर्व साधनं आणली आहेत.

डहाणू (पालघर) : पालघर जिल्ह्यात भूकंपाचं सत्र सुरुच आहे. काल दिवसभरात भूकंपाच्या 5 धक्क्यांनी पालघर जिल्हा हादरला. भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू झाला. वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमिवर पिंपरी चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफची दोन पथकं पालघरमध्ये पोहोचली आहेत. भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना भूकंपानंतरच्या परिस्थितीला कसं सामोरं जावं याचं प्रात्यक्षिक एनडीआरएफकडून देण्यात येणार आहे. एनडीआरएफने सोबत 200 टेंट आणि आपत्ती व्यवस्थापनाची सर्व साधनं आणली आहेत. काल झालेली भूकंपाच्या धक्क्यांनंतर बरेचशी कुटुंबं भीतीच्या सावटाखाली आहेत. ती घरात राहायला तयार नाहीत. त्या कुटुंबांना टेंटमध्ये राहण्याची सोय एनडीआरएफकडून केली जात आहे. तसेच 40 जवानांच्या दोन तुकड्या विभागून नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत. मोठा भूकंप झालाच तर न घाबरता त्याला कसं सामोरं जावं याचं प्रात्यक्षिक दिलं जाणार आहे. पालघर भूकंप : एनडीआरएफची दोन पथकं पोहोचली, नागरिकांमध्ये जनजागृती करणार पालघर भूकंप : आरोग्य विभागासह एनडीआरएफला पाचारण पालघर जिल्ह्यात काल दिवसभरात एकामागोमाग एक भूकंपाच्या 6 धक्क्यांनी हादरलं आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. हे धक्के 4.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे असल्यानं पालघरवासियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  त्यातच भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या एका चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान एकामागोमाग एक धक्के बसत असल्यानं प्रशासनामार्फतही दक्षता घेण्यात येत आहे. कच्च्या बांधकामाची घर असलेल्यांना रात्री घराबाहेरच झोपण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. भुंकपाच्या धक्क्यांमुळे लोकांच्या घरांची पडझड होत असून शाळांच्या भिंतींना तडे पडले आहेत. त्यामुळे सततच्या धक्क्यांमुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, चिमुकलीचा मृत्यू भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू झाला. वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पालघरला काल सकाळी 7 वाजता भूकंपाने पहिला तडाखा दिला. सर्व शांत होत नाही तोवर जमीन पुन्हा हादरली. या भूकंपाने पालघरकरांना अक्षरश: रस्त्यावर आणलं. लोक दुकान, घरं सोडून रस्त्यावर आले. इतकचं काय शाळेवतील विद्यार्थीही जीव मुठीत घेऊन मैदानात दाखल झाले. पालघरला भूकंपाचे धक्के काही नवीन नाहीत. मात्र एकाच दिवसात लागोपाठच्या धक्क्यांनी मात्र कहर केला. घरांच्या भिंतीना पडलेल्या भेगांनी भूकंपाची तीव्रता दाखवली. लागोपाठच्या धक्क्यांनी भेदरलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा शाळेत जायची हिंम्मत होत नाही. पालघरमध्ये भूकंपाची वारंवारता, तीव्रता आणि व्यापकता ही दिवसागणिक वाढत आहे. हे वाढते धक्के मोठ्या भुकंपाची चाहूलही असू शकतात. मात्र तीन भूकंप मापन करणाऱ्या यंत्रांशिवाय सरकारने काय उपायोजना केल्या हा प्रश्न जनतेला पडला आहे. तलासरी आणि डहाणू तालुके गेल्या तीन महिन्यापासून भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भीतीने नागरिकांना रात्री-अपरात्री घराबाहेर अंगणात उघड्यावर झोपावे लागत आहे. आतापर्यंत 14 पेक्षा जास्त वेळा भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. पालघरमधील भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम - 11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल - 24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल - 1 डिसेंबर - 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केल - 4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल - 7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल - 10 डिसेंबर - 2.8 व 2.7 रिश्टर स्केल - 20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल - 24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल - 1 फेब्रुवारी - 3.3, 3.5, 3.0, 4.1 रिश्टर स्केल पालघरमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के का जाणवतात? 
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget